अकलूज येथे मुलीने व आईने एकाच वेळी दहावीच्या परीक्षेत यश संपादन केले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, May 9, 2026

अकलूज येथे मुलीने व आईने एकाच वेळी दहावीच्या परीक्षेत यश संपादन केले

 अकलूज येथे मुलीने व आईने एकाच वेळी दहावीच्या परीक्षेत यश संपादन केले




अकलूज (कटूसत्य वृत्त):- माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे यांच्या वतीने मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत अकलूज येथील मायलेकीने एकाच वेळेस दहावीची परीक्षा देवून त्यांनी पास होवून बाजी ही मारली आहे.दोघीने हे यश एकाच वेळी संपादन केल्यामुळे आई व लेकीवर सर्वस्तरातून अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षांव होत आहे.
            अकलूज येथील जिजामाता कन्या प्रशालेतील विद्यार्थिनी कु.लक्ष्मी नागनाथ क्षीरसागर हिने ५०० पैकी ४११ गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे.तर तिची आई सौ.पुजा नागनाथ क्षीरसागर यांनी वयाच्या ३७ व्या वर्षी दहावीची परीक्षा देवून ५०० पैकी २१८ गुण मिळत पास होवून यश मिळवले आहे.आई व मुलीने एकाच वेळी पास झाल्या आहेत.त्यामुळे या मायलेकीचे अकलूज परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
         सौ.पुजा नागनाथ क्षीरसागर या सध्या यशवंतनगर येथील सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्राच्या २१ चारी जयसिंहनगर येथे सीआरपी पदावर कार्यरत आहेत.जीवनाच्या प्रवासात त्यांना अपु-या शिक्षणामुळे असल्यापुढे अडचणी येवू लागल्यामुळे ३७ व्या वर्षी त्यांनी बाहेरून परीक्षा देवून हे यश संपादन केले आहे.आपली मुली इंजिनीअर होण्याचे त्यांनी ठरविले आहे.घरची परिस्थिती सर्व साधारण असल्यामुळे मुलीच्या शिक्षणासाठी त्या अहोरात्र परिश्रम घेत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages