सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये महाराष्ट्र दिन व कर्मचारी दिन उत्साहात साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, May 9, 2026

सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये महाराष्ट्र दिन व कर्मचारी दिन उत्साहात साजरा

 सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये महाराष्ट्र दिन व कर्मचारी दिन उत्साहात साजरा





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, केगाव येथे महाराष्ट्र दिन व कामगार (कर्मचारी) दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.


कार्यक्रमाच्या प्रारंभी कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकावण्यात आला. यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे, सीआरटीएडचे संशोधन संचालक व ज्येष्ठ संशोधक एस. एच. पवार, पब्लिक स्कूलच्या प्राचार्या शाहीन शेख, उपप्राचार्य प्रकाश नवले, निखहत शेख, मुख्य प्रबंधक डॉ. डी. आय. नवले यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.



महाराष्ट्र दिनानिमित्त विविध मान्यवरांनी महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेचा गौरव करत कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या प्रगतीत कर्मचारी वर्गाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
यावेळी विविध प्रवर्गातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा “बेस्ट एम्प्लॉयी ऑफ द इयर” सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. 


पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांनी, “प्रामाणिकपणा, समर्पण आणि उपक्रमशीलतेच्या जोरावर संस्थेची उंची वाढते. पुरस्कार विजेत्या कर्मचाऱ्यांचा इतरांनी आदर्श घ्यावा,” असे प्रतिपादन केले.
यावेळी पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात संस्थेतील सेवाभाव, शिस्त आणि कार्यनिष्ठा यांचा विशेष उल्लेख करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संस्थेच्या प्रतिनिधींनी केले. संपूर्ण परिसरात राष्ट्रभक्ती व गौरवाचे वातावरण निर्माण झाले होते.


━━━━━━━━━━━━━━
हे गुणवंत कर्मचारी
━━━━━━━━━━━━━━
उपक्रमशील विशेष कामगिरी : जुवेरिया शेख
शिपाई प्रवर्ग : मनोज सलगर
मावशी प्रवर्ग : करिष्मा मुलानी, अरुणा शिंदे
बस चालक प्रवर्ग : नूर शेख
वसतिगृह अधीक्षक प्रवर्ग : सिंधू पोळ
शिक्षकेतर कर्मचारी प्रवर्ग : विनायक नाळे
कार्यालयीन कर्मचारी प्रवर्ग : रामकृष्ण लांबतुरे (जनसंपर्क अधिकारी)
शिक्षक कर्मचारी प्रवर्ग : शशिकांत लामकाने, (अभियांत्रिकी महाविद्यालय) राजू ठाकूर (पब्लिक स्कूल अँड ज्यूनिअर कॉलेज)
१०० टक्के उपस्थिती पुरस्कार : गोपाळ भारत नलवडे, स्मिता नवले, शाहीन शेख (मुख्याध्यापिका)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages