गॅसटंचाईवर पर्याय म्हणून सोलापुरात रेशनवर रॉकेल वाटपास सुरुवात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, May 11, 2026

गॅसटंचाईवर पर्याय म्हणून सोलापुरात रेशनवर रॉकेल वाटपास सुरुवात

 गॅसटंचाईवर पर्याय म्हणून सोलापुरात रेशनवर रॉकेल वाटपास सुरुवात




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आखाती देशांतील युद्धस्थितीमुळे निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य गॅस टंचाईवर उपाययोजना म्हणून शासनाने पुन्हा एकदा रेशन दुकानांतून केरोसीन (रॉकेल) वाटपाचा निर्णय घेतला आहे.

सर्वोच्च न्यायालयातील एका याचिकेमुळे २०१६ पासून बंद झालेला हा पुरवठा तब्बल १० वर्षांनंतर पुन्हा सुरू झाला असून, सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुक्यापासून याचे वाटप सुरू करण्यात आले आह

सोलापूर जिल्ह्यासाठी एकूण १ लाख ४४ हजार लिटर केरोसीन मंजूर झाले आहे. त्यापैकी १२ हजार लिटरचा पहिला टँकर जिल्ह्यात दाखल झाला असून, प्रशासनाने त्याचे वितरण सुरू केले आहे. ग्रामीण भागासाठी १ लाख ३२ हजार लिटर, तर सोलापूर शहरासाठी १२ हजार लिटरचा कोटा निश्चित करण्यात आला आहे.

गेल्या दहा वर्षांत केरोसीनच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. २०१६ च्या तुलनेत आता हे दर २२ ते २३ रुपयांनी वाढले असून, शिधापत्रिकाधारकांना प्रतिलिटर ६२ ते ६३ रुपये दराने रॉकेल मिळणार आहे. वाहतूक खर्चामुळे वेगवेगळ्या तालुक्यांत दरात थोडाफार फरक असू शकतो.

गेल्या दशकात एलपीजी गॅस सहज उपलब्ध झाल्यामुळे ग्रामीण व शहरी भागातून ''स्टोव्ह'' जवळपास हद्दपार झाले आहेत. आता रॉकेल मिळणार असले तरी, ते वापरण्यासाठी अनेकांना पुन्हा नवा स्टोव्ह आणि तो स्वच्छ करण्यासाठी लागणारी ''पिन'' खरेदी करावी लागणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages