राम गणेश गडकरी यांच्या नाटकातून वाघ्या कुत्र्याची निर्मिती- इतिहासकार इंद्रजीत सावंत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 26, 2025

राम गणेश गडकरी यांच्या नाटकातून वाघ्या कुत्र्याची निर्मिती- इतिहासकार इंद्रजीत सावंत

 राम गणेश गडकरी यांच्या नाटकातून वाघ्या कुत्र्याची निर्मिती

- इतिहासकार इंद्रजीत सावंत 


कोल्हापूर (वृत्तसेवा):-रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे स्मारक हे कपोल कल्पित स्मारक आहे, याची इतिहासात कुठलीही नोंद नाही. इतिहासात आणि दस्तावेजमध्ये या वाघ्या याची कुठलीही नोंद नसताना त्या स्मारकाला संरक्षण दिले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपूर्ण जीवन चरित्रात वाघ्या कुत्र्याची कुठेही नोंद नाही. तसेच, वाघ्या कुत्र्याचे स्मारक करुन छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा काहींचा प्रयत्न होता. राम गणेश गडकरी यांच्या नाटकातून वाघ्या कुत्र्याची निर्मिती झाली, असे इंद्रजीत सावंत यांनी म्हटले आहे.

रायगड किल्ल्यावर असलेला वाघ्या या कुत्र्याचा पुतळा हटविण्याची मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 22 मार्च रोजी लिहिलेल्या पत्रात हा पुतळा 31 मेपूर्वी हटवावा अशी मागणी केली आहे. "हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आली आहे. सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages