सभागृह चालवायचे कशासाठी, आमदार जानकरांनी उठवला आवाज - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 26, 2025

सभागृह चालवायचे कशासाठी, आमदार जानकरांनी उठवला आवाज

 सभागृह चालवायचे कशासाठी, आमदार जानकरांनी उठवला आवाज

मुंबई (कटूसत्य वृत्त):-गरिबांच्या घरकुलासाठी, शेतकऱ्यांची कर्जमाफी, सोलर वीज कनेक्शन, दुधाचा प्रश्न, महात्मा फुले आरोग्य योजना या सह अनेक प्रश्नावर आ. उत्तमराव जानकर अधिवेशनात आवाज उठवला.आ. जानकर म्हणाले, सरकारचे धोरण हे गोरगरिबांच्या किंवा समाजाच्या हिताचे नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्ष होती. मात्र असे काहीही घडलेले नाही. ७५ वर्षापासून आपण वीज, पाणी आणि रस्ते एवढीच मागणी या ठिकाणी करतोयपरंतु अनेक असे प्रकल्प आहेत ते सुरू नाहीत. निरा देवधर सारखा प्रकल्प आहे गेल्या ५१ वर्षा पासून त्याच्या पूर्णत्वाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. धरण बांधून त्याला कॅनॉलच नाहीत. सरकारने दोन हजार कोटी रुपये दिले असते तर निश्चितपणाने तो प्रकल्प पूर्ण झाला असता. नगरपालिका एरिया असेल नगरपंचायत एरिया असेल त्या ठिकाणी घरकुलासाठी अडीच लाख रुपये देतो आणि ग्रामीण भागासाठी आपण सव्वा लाख रुपये देतो असा हा फेरबदल का? आमदार निवासावर सरकार दुरुस्तीसाठी ५० लाख रुपये"खर्च करते, गोरगरिबांच्या घरांसाठी मात्र सव्वा लाख रुपये वाढवून देत नाही असा प्रश्न आ. जानकर यांनी केला.सभागृहाच्या माध्यमातून गोरगरिबांच्या हिताचे शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय झाले पाहिजेत, जर असे होत नसेल तर हे सभागृह चालवायचे कशासाठी, सभागृहामध्ये आपण जो खर्च करतो, आम्ही रात्रीचे दहा ते अकरा वाजेपर्यंत सदस्य या ठिकाणी बसून राहतोय याचा काय उपयोग असा प्रश्न आ. उत्तम जानकर यांनी विचारला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages