मराठा म्हणजे एक जात नाही तर छत्रपतींच्या महाराष्ट्रातील प्रत्येक जात म्हणजेच मराठा - सौरभ खेडकर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-मराठा म्हणजे एक जात नाही तर छत्रपतींच्या महाराष्ट्रातील प्रत्येक जात म्हणजेच मराठा असून एकट्या मराठा जातीचे सैन्य नव्हते तर त्यात सर्व अठरा पगड जाती धर्माचे व बारा बलुतेदार यांना शिवरायांनी मावळा शब्दात सर्वांना एकत्र केले होते.यामुळेच आपण मुस्लिमासह सर्व जाती धर्माचे लोकं एकोप्याने राहत आहोत असे प्रतिपादन सौरभ खेडेकर यांनी केले.
सौरभ खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या जिजाऊ रथयात्रेचे आगमन सोमवारी सायंकाळी मराठा सेवा संघ संचालित 'जिजाऊ रथयात्रा २०२५'मराठा जोडो अभियान' या यात्रेचे आगमन झाले.यावेळी उपस्थिताना संबोधित करताना सौरभ खेडेकर हे बोलत होते.
पुढे बोलताना खेडेकर म्हणाले की,जिजाऊने सोन्याचा नांगर फिरवून पुणे वसविले आहे.पुण्यातील लाल महालात ६५०० कि.मी.प्रवास करून जिजाऊ रथयात्रेची सांगता होणार आहे.सर्वांच्या वतीने शिवजयंती साजरी होत आहे.मात्र अलीकडे दोन-तीन वर्षात हे वातावरण नासविण्याचे कार्य काही घातक शक्तीकडून करण्यात येत आहे.हे वातावरण शांत राहण्यासाठी सजग नागरिकांनी बाहेर पडले पाहिजे.युवकांना मार्गदर्शन करायला हवे.आपण सर्वांकडून जबाबदारी स्विकारून दंगल मुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी प्रयत्न व्हावेत.प्रगतीसाठी शांतता समन्वयाचे वातावरण असले पाहिजे.शाहू,फुले, आंबेडकर यांच्या विचाराशी एकरूप झाले पाहिजे.यात्रेस प्रचंड प्रतिसाद लाभत असून विचारांची भूक खूप वाढली आहे.वेग वाढवून शांतता प्रस्थापित करावयाची आहे.आरक्षण हे तर हक्काचेच आहे.ते मिळालेच पाहिजे पण ते एकच ध्येय असू नये असेही खेडकर म्हणाले.नौकऱ्या शिल्लक नाहीत.त्या भरल्या जात नाहीत.यामुळे विचार करून सावध पावले उचलली पाहिजेत.यासाठी उद्योजक व शेती व्यवसाय करायला हवा.जे टाळता येईल ते टाळले पाहिजे.सर्वांनी साधी लग्ने केली पाहिजेत.असलेले पैशाचा काळजीपूर्वक वापर केला पाहिजे.कोण कबरीचे काढतो,कोण दुसरेच काही काढतोय.यामुळे भावनिक होऊन काही करू नका. नवीन समाज निर्मिती झाली पाहिजे असे ही शेवटी सौरभ खेडेकर म्हणाले.
0 Comments