आमदार देवेंद्र कोठे यांचे गाजले विजय संकल्प सभेतील भाषण
सोलापूरकरांनी केले कौतुक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणात
आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या मागण्यांच्या पूर्ततेचे संकेत
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शनिवारी झालेल्या विजय संकल्प सभेत आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेले भाषण चांगलेच गाजले. विकासाच्या मुद्द्यावर आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या भाषणाचे सोलापूरकरांनी कौतुक केले. आमदार देवेंद्र कोठे यांनी भाषणादरम्यान केलेल्या विकास कामांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात त्या मागण्यांच्या पूर्ततेचे संकेत दिले.
आमदार देवेंद्र कोठे यांनी आपल्या भाषणात ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांची शपथ घेऊन सांगितले की सोलापूरकरांना दररोज पाणी दिल्याशिवाय मत मागायला येणार नाही. सोलापूरकरांना दररोज पाणी देऊ शकलो नाही तर मी आमदारकीचा त्याग करेन असेही आमदार देवेंद्र कोठे यावेळी म्हणाले. त्यांच्या या विधानाला सोलापूरकरांनी टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजरात उचलून धरले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या निधीची यादीच आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूरकरांसमोर सादर केली. सोलापूरची विमानसेवा, आयटी पार्क, स्मार्ट सिटी अंतर्गत झालेली इंदिरा गांधी स्टेडियम, स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव, रेल्वे स्थानक येथील विकासकामे तसेच ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिराशेजारील तलाव परिसरात झालेली कामे सांगताना आमदार देवेंद्र कोठे यांनी या कामांवर टीका करणाऱ्या विरोधकांचाही चांगलाच समाचार घेतला.
सोलापूर महानगरपालिकेची सत्ता मिळवण्याची भाषा करणाऱ्या विवाहिकासत्ता मिळवण्याची भाषा करणाऱ्या महाविकास आघाडीला सर्व १०२ जागांवर उमेदवार देखील उभे करण्यात अपयश आले असे सांगत त्यांनी विरोधकांचे वाभाडे काढले.
आमदार देवेंद्र कोठे यांनी भाषणादरम्यान मांडलेल्या दररोज पाणी पुरवठा, बी टू चा प्रश्न, तिरुपती, बंगळुरू विमानसेवा, आयटी पार्क, हजारो सोलापूरकरांना घरकुल आदी मुद्द्यांवर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यांच्या अंमलबजावणीची संकेत आपल्या संबोधनात दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार देवेंद्र कोठे यांचा उल्लेख सोलापूरचे युवा आमदार असे करताच उपस्थित गर्दीमधून झालेला टाळ्यांचा गजर शहर मध्य विधानसभेतून सर्वात मोठ्या संख्येने आलेल्या गर्दी अधोरेखित करत होता. एकूणच आमदार देवेंद्र कोठे यांनी शनिवारी झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजय संकल्प सभेत बाजी मारल्याचे दिसून आले.
रोज पाणी दिल्याशिवाय फेटा बांधणार नाही
सोलापूरकरांना दररोज पाणी दिल्याशिवाय फेटा न बांधण्याचा केलेला संकल्प मी गेल्या तीन महिन्यांपासून पाळत आहे. जोपर्यंत सोलापूरकरांना दररोज पाणी देत नाही तोपर्यंत मी फेटा बांधून घेणार नाही, असे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगतात सोलापूरकरांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला.


0 Comments