प्रभाग ४ मध्ये राष्ट्रवादीच्या फुटाणे, बिडवे, चंदनशिवेसह
सुशिल बंदपट्टे यांची भव्य पदयात्रा
संविधान, माणुसकी व समानतेच्या संदेशासह
‘कामाचा माणूस, आपला माणूस’चा नारा देत जोरदार शक्तिप्रदर्शन
सोलापूर (कटूसत्य वृत्त) – सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना युतीच्या उमेदवारांनी रविवारी भव्य पदयात्रा काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. जात, धर्म, पंथ यापेक्षा माणुसकी, समानता आणि संविधानधर्म महत्त्वाचा आहे, असा स्पष्ट संदेश या पदयात्रेतून देण्यात आला.
संविधानाने दिलेले सर्वधर्मसमभाव, हक्क, अधिकार आणि कर्तव्ये जपणे हीच खरी लोकशाही असल्याचे यावेळी ठळकपणे मांडण्यात आले. परमवंदनीय युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे नेणे हेच आपले कर्तव्य आहे, अशी भावना उमेदवार सी.ए. सुशिल बंदपट्टे यांच्यासह कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना चे युतीचे अधिकृत उमेदवार कविता आनंद चंदनशिवे, सी. ए. सुशील चंदू बंदपट्टे, सारिका विवेक फुटाणे व विश्वनाथ दत्तात्रय बिडवे यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
ही पदयात्रा बाळीवेस बुधले गल्ली, तुळजापूर वेस, मंगळवार पेठ पोलीस चौक, भुसार गल्ली, कुंभार वेस, क्षत्रिय गल्ली, कौतंम चौक, मधला मारुती, टिळक चौक, कस्तुरबा मार्केट, बारामीर चौक, शिवगंगा मंदिर, डिके ऑफिस, बाळीवेस चौक, महमाने चाळ, लाडका गणपती, जम्मा वस्ती, भिमाई चौक, हनुमान नगर, खोलवा रस्ता, बॉबी चौक, श्राविका शाळा, दमानी शाळा, स्वीपर कॉलनी, वडार गल्ली, लक्ष्मण महाराज पुतळा आदी मार्गांवरून मार्गक्रमण करत आनंद दादा चंदनशिवे यांच्या कार्यालयाजवळ सांगता झाली.
‘कामाचा माणूस, आपला माणूस’चा नारा
पदयात्रेदरम्यान “कामाचा माणूस, आपला माणूस” हा नारा देत युतीच्या उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधला. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सुशिक्षित, संवेदनशील आणि संविधाननिष्ठ नेतृत्वाची गरज असल्याचे उमेदवारांनी सांगितले.
या पदयात्रेत युतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक-युवती, महिला तसेच विविध समाजघटकांतील नागरिक व मतदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रभाग क्रमांक ४ मध्ये युतीच्या प्रचाराला या पदयात्रेमुळे नवी ऊर्जा मिळाल्याचे चित्र दिसून आले.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संविधान, समानता आणि विकासाचा अजेंडा घेऊन मैदानात उतरलेल्या युतीकडे मतदारांचा कल वाढत असल्याचे संकेत या पदयात्रेतून स्पष्ट झाले आहेत.


0 Comments