मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांचे दर्शन बाराबंदी पोशाखात केले संबोधन : सोलापूरकरांची जिंकली मने - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, January 11, 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांचे दर्शन बाराबंदी पोशाखात केले संबोधन : सोलापूरकरांची जिंकली मने

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांचे दर्शन

बाराबंदी पोशाखात केले संबोधन : सोलापूरकरांची जिंकली मने

सोलापूर  (कटूसत्य वृत्त):-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सोलापूरला महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ विजय संकल्प सभेसाठी आल्यानंतर ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. तसेच ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील प्रसिद्ध पारंपारिक बाराबंदी पोशाखात सोलापूरकरांना संबोधित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अनोख्या कृतीने सोलापूरकरांची मने जिंकली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापुरात आगमन झाल्यानंतर त्यांनी सभेपूर्वी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरास भेट दिली. या ठिकाणी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी त्यांचे स्वागत केले. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिवत पूजा केली.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, विश्वस्त सिद्धेश्वर बमणी, ऍड. आर. एस. पाटील, मल्लिनाथ मसरे, शिवकुमार पाटील, सोमशंकर देशमुख, डॉ. राजेंद्र घुली, नीलकंठ कोनापुरे, विश्वनाथ लब्बा, मल्लिकार्जुन कळके, सी. बी. नाडगौडा, गुरु माळगे, प्रभुराज मैंदर्गीकर, रतन रिक्के, कुंभार आदी उपस्थित होते.


मंदिरातून सभेच्या ठिकाणी आल्यानंतर भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुढील ५ वर्षे सोलापूरकरांच्या सेवेची संधी आम्हाला द्यावी, अशी प्रार्थना मी श्री सिद्धरामेश्वर महाराजांकडे केली आहे. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांचा आशीर्वाद मिळाला की मागे वळून पहावे लागत नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रसंगी म्हणाले.

यावेळी सोलापूर शहर भारतीय जनता पार्टीतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नंदीध्वज आणि बाराबंदी परिधान केलेल्या भक्तांची प्रतिकृती भेट स्वरूपात देण्यात आली. व्यासपीठावर असलेली ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांची भव्य मूर्ती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बाराबंदीचा पोशाख, त्यांना देण्यात आलेली नंदीध्वजांची प्रतिकृतीची भेट आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला 'एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र, श्री सिद्धेश्वर महाराज की जय' चा जयघोष यामुळे वातावरण भक्तीमय झाले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages