Hot Posts

6/recent/ticker-posts

बारामतीच्या धर्तीवर सोलापूरचा विकास करणार-कृषिमंत्री भरणे

 बारामतीच्या धर्तीवर सोलापूरचा विकास करणार-कृषिमंत्री भरणे

हत्तुरेवस्ती येथे यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर निवडणुकीच्या महानगरपालिका पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शहराचा दौरा केला.या दौऱ्यादरम्यान त्यांनी हतुरे  वस्ती येथील सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब हत्तुरे व श्रीशैल हतुरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन कार्यकत्यांशी संवाद साधला.यावेळी बोलताना भरणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाच्या ध्येयधोरणांचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सोलापूरच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. बारामतीच्या धर्तीवर सोलापूरचा कायापालट करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शहरात राष्ट्रवादी काँग्रेससाठी अत्यंत पोषक वातावरण तयार झाले असून सर्व स्तरांतून जनसामान्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आगामी निवडणुकीत घडयाळ या चिन्हासमोरील बटण दाबून राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी हत्तुरे परिवारासह उमेश पाटील, जिल्हाध्यक्ष संतोष पवार, शहराध्यक्ष जुबेर बागवान, वैजनाथ हतुरे, संजय हतुरे, विनायक हतुरे, वीरेश हत्तुरे, महेश हत्तुरे, विनय हतुरे, रितेश हतुरे, प्रभाग २५ चे उमेदवार वैभव हत्तुरे, सुरेखा काळे आणि सुकेशनी गंगोडा प्रभाग २६ मधील उमेदवार किरण सर्वगोड, सागर हत्तुरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार अरुण मोरे यांच्यासह अन्य कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येन उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments