कोठे - कल्याणशेट्टी जोडीच्या भरीव विकासाच्या अभिवचनाने जिंकली नागरिकांची मने
प्रभाग क्रमांक ११ मध्ये लिंगायतबहुल भागात नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादात झाली सभा : मतदारांमध्ये अपूर्व उत्साह
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- रस्ते, ड्रेनेज, पाणी अशा विकासकामांसाठी प्रभाग क्रमांक ११ मध्ये १२ कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. यातील ९ कोटी रुपयांची कामे सध्या सुरू आहेत. भविष्यातही प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भरघोस निधी आणण्यात येईल या आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या अभिवचनाने नागरिकांची मने जिंकली. प्रभाग क्रमांक ११ मधील राजीव नगर येथे नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादात सभा झाली. लिंगायत समाजाचे प्राबल्य असलेल्या भागात झालेल्या या सभेतून आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी परिसरातील नागरिकांची मने जिंकली.
याप्रसंगी व्यासपीठावर आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, गुरुशांत धुत्तरगावकर
उमेदवार युवराज सरवदे, शारदाबाई रामपुरे, मीनाक्षी कडगंची, अजय पोन्नम, राजकुमार हंचाटे, प्रकाश म्हंता, गणेश चवरे उपस्थित होते.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी याप्रसंगी कन्नड भाषेत नागरिकांशी संवाद साधला. आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रभाग क्रमांक ११ सह शहर मध्य मतदारसंघात मोठा विकास केला आहे. सोलापूर शहरात विमानसेवा, आयटी पार्क, समांतर जलवाहिनी, समतोल पाणीपुरवठ्यासाठी ८९२ कोटी रुपयांच्या योजनेतला मंजुरी अशी अनेक विकासकामे झाली आहेत. भविष्यातही अनेक विकासकामे होणार आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक ११ सह सोलापूरकरांनी भाजपाच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी याप्रसंगी केले.
आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे शहर मध्य विधानसभा मतदारसंघात १४७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातील कोट्यवधी रूपयांची कामे प्रगतीपथावर आहेत. काँग्रेसच्या तत्कालीन आमदार प्रणिती शिंदे यांना त्यांच्या १५ वर्षांच्या कार्यकाळातदेखील इतका निधी मिळाला नाही. खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रभाग क्रमांक ११ मध्ये ९० लाख रुपयांचा तरी निधी दिला आहे का ? असा प्रश्न आमदार देवेंद्र कोठे यांनी उपस्थित केला.
आपण संघटित झालो तर अंगणातील तुळस आणि देवळावरील कळस सुरक्षित राहणार आहे. एमआयएम सारख्या पक्षाला डोक्यावर बसवून घेणे आपल्याला परवडणारे नाही. त्यामुळे मतदारांनी भाजपच्या चारही उमेदवारांना प्रचंड मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहनही आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी केले.
मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना मिळणार ३ हजार रुपये
लाडकी बहीण योजना बंद होईल असा खोटा प्रचार काँग्रेस आणि विरोधकांकडून केला जात होता. परंतु ही योजना सुरू असून भविष्यातही ही योजना सुरू राहणार आहे. यंदाच्या मकर संक्रांतीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार आहेत. तसेच सोलापूर महानगरपालिकेवर सत्ता आल्यानंतर लाडक्या बहिणींना मिळणारी रक्कम एक हजार ५०० वरून २ हजार १०० करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचेही आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी सांगितले.

0 Comments