दहा तारखेला होणाऱ्या देवा भाऊंच्या सभेकडे सोलापूरकरांचे लागले लक्ष

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे बोलतात ते करुन दाखवतात हा प्रत्यय सोलापूरकरांना वेळोवेळी आला आहे. उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनी, विमानसेवा आणि आयटी पार्क नंतर देवा भाऊ सोलापूरकरांना काय भेट देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापुरात एकच चर्चा आहे ती म्हणजे दहा तारखेला हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेची.

सोलायूरच्या विकासाला नवी दिशा देण्याचे काम कुणी केले असेल तर ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी. देवाभाऊ जे बोलतात ते करुन दाखवतात याचा प्रत्यय वेळोवेळी सोलापूरकरांना आला आहे. सोलापूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याची हमी देवाभाऊंनी दिली आणि उजनी सोलापूर दुहेरी पाईपलाईनसाठी तब्बल 892 कोटी रुपयांचा निधी दिला. त्यामुळे सोलापूरच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपणार आहे.
गेल्या पंधरा वर्षापासून बंद पडलेली सोलापूरची विमान सेवा सुरू करण्याचे आश्वासन देवा भाऊंनी दिले आणि ते पूर्णत्वास नेले. सोलापूर गोवा विमानसेवा सुरू झाली नंतर सोलापूर मुंबई विमान सेवा सुरू आहे. यापुढे सोलापूरहुन तिरुपती बेंगलोरु विमानसेवा सुरू करण्याचा मानस आहे.
दहिटणे येथे झालेल्या कार्यक्रमात देवाभाऊंनी सोलापुरात आयटी पार्कची करण्याची घोषणा केली आणि काय, अवघ्या चार महिन्यात आयटी पार्कसाठी जागा निश्चीत होऊन काम सुरु झाले. लवकरच आयटी कंपन्यां सोलापुरात सुरु होतील आणि हजारो तरुणांना काम मिळेल.
त्यानंतर आता 10 जानेवारी रोजी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर देवाभाऊंची सभा होणार आहे. सभेत देवाभाऊ सोलापूरकरांसाठी कोणती घोषणा करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. देवा भाऊंनी आतापर्यंत ज्या ज्या घोषणा केल्या त्या पूर्ण केल्या. त्यामुळे सोलापूरकरांचा देवाभाऊ आणि भाजपवरील विश्वास वाढला आहे. सोलापूरकर आणि देवाभाऊ यांचे नातं दिवसेंदिवस घट्ट होत आहे.
यासाठी दुवा ठरले आहेत ते म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे. ना. गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सोलापूरच्या विकासाचा नवा अध्याय सुरू केला आहे.
10 तारखेला होणाऱ्या देवाभाऊंच्या सभेसाठी जय्यत तयारी झाली असून कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सर्वसामान्य सोलापूरकर यांना एकच आशा आहे ती म्हणजे देवाभाऊ. सोलापूरच्या विकासाचे नवे पर्व या सभेच्या निमित्ताने सुरू होणार आहे.
0 Comments