प्रभाग २५ मध्ये राष्ट्रवादीची शक्तिप्रदर्शन रॅली
ही प्रचार रॅली शांतीनगर परिसर, चंद्रकला नगर, कलावती नगर, नरसिंह नगर, सिद्धेश्वर नगर, गांधी नगर-१, नागनाथ नगर, देसाई नगर, राजीव गांधी नगर व महालक्ष्मी नगर या भागांतून काढण्यात आली. रॅली मार्गावर ठिकठिकाणी उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. महिलांनी औक्षण करून, तर नागरिकांनी पुष्पवृष्टी करत आपला पाठिंबा दर्शवला.
यावेळी बोलताना वैभव हत्तुरे म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राज्याच्या विकासासाठी मांडलेले व्हिजन डोळ्यांसमोर ठेवून प्रभाग २५ चा सर्वांगीण कायापालट करण्याचे आमचे ध्येय आहे. रॅलीला मिळालेला प्रतिसाद ही परिवर्तनाची लाट असून जनतेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्याचे त्यांनी नमूद केले.
बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीशैल हत्तुरे यांनी सांगितले की, आम्ही आजवर सातत्याने जनतेची सेवा केली असून, याच सेवेचा वारसा पुढे नेत राजकारणाच्या माध्यमातून प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत.
या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने महिला व युवक सहभागी झाले होते. जोरदार घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
.png)
0 Comments