Hot Posts

6/recent/ticker-posts

स्त्रीशक्तीच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार : सोनिया गोरे

 स्त्रीशक्तीच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार : सोनिया गोरे




पोखरापूर (कटूसत्य वृत्त):- खताळ परिवाराशी आमचे गेल्या अनेक वर्षांपासून ऋणानुबंध आहेत. कष्ट, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या बळावर त्यांनी उभा केलेला व्यवसाय निश्चितच कौतुकास्पद आहे. जिथे जिथे मदतीची गरज भासेल, तिथे आम्ही कायम पाठीशी उभे राहू, असे आश्वासन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे यांनी दिले.

लांबोटी येथे जयशंकर सुपर मार्केटच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी सोनिया गोरे व राजश्री पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कामती पंचायत समिती गणातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्त्रीशक्तीचा सन्मान करण्यात आला.

क्रांतीनाना मळेगावकर यांच्या ‘होम मिनिस्टर’ व ‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मराठी व हिंदी गीतांच्या सादरीकरणावर महिलांनी ठेका धरत जल्लोष केला. सुमारे तीन ते साडेतीन हजार महिलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

जयशंकर सुपर मार्केटचे उद्घाटन राजश्री राजन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या संयोजिका माजी पंचायत समिती सदस्या विमलताई तानाजीराजे खताळ यांच्यासह गणेश (आप्पा) खताळ, उर्मिला खताळ, कविता खताळ, अक्षय खताळ, रुद्राक्ष खताळ, अनिरुद्ध खताळ, संग्राम खताळ, धनश्री खताळ, सोनल खताळ, सोनाली खताळ, वृषाली खताळ, अहिल्या खताळ आदींसह संपूर्ण खताळ परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन गणेश (आप्पा) खताळ व अक्षय खताळ यांच्या नेतृत्वाखाली खताळ परिवाराने केले असून हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.

Reactions

Post a Comment

0 Comments