Hot Posts

6/recent/ticker-posts

मराठा-बहुजन समाजाने एक होऊन नव्या उमेदीने पुढे जावे- खेडेकर

 मराठा-बहुजन समाजाने एक होऊन नव्या उमेदीने पुढे जावे- खेडेकर 

कुर्डूवाडीकरांनी केले जिजाऊ रथयात्रेचे जल्लोषात स्वागत

 कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):-बटेंगे तो कटेंगे हे मराठा आणि बहुजन समाजालाही लागू होते त्यामुळे मराठा आणि बहुजन समाजाने एक होऊन नव्या उमेदीने पुढे जावे असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर यांनी मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ रथयात्रेच्या कुर्डूवाडीतील सभेत बोलताना केले. 

  मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे ही मराठा सेवा संघाची १९९१ पासूनची मागणी आहे.तो लढा कायम ठेऊन  आर्थिक निकषावरील १० टक्के आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी  युवकांनी प्रयत्न करावा. समाजातील युवकांनी उद्योगशीलता वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मराठा आणि बहुजन समाजाने एकीने,शांततेने राहून आपली प्रगती केली पाहिजे,युवकांनी भावनिक होऊन आपले आयुष्य बरबाद करू नये, समन्वयाची, समतेची शांततेची जी परिस्थिती महाराष्ट्रात होती ती पुन्हा आणणे गरजेचे आहे. ज्या ज्या देशात धर्मांधता आहे ती राष्ट्रे तळागाळाला गेली आहेत, त्यामुळे आपल्या बहुजन समाजाने एकीने,समन्वयाने शांततेने राहून आपली वैयक्तिक, सामाजिक प्रगती करणे गरजेचे आहे, मराठा - बहुजन समाजाने विवाहावरील अनावश्यक खर्च टाळावेत, खर्च वाचविणे हे सुद्धा एक उत्पन्न असते, असे सौरभ खेडेकर पुढे म्हणाले. 

मराठा सेवा संघाच्या वतीने संस्थापक-अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांच्या संकल्पनेतून  पंजाब, सिंध, गुजरात, मराठा या राष्ट्रगीतातील ओळीप्रमाणे अठरापगड जातीतील मराठा आणि बहुजन समाजबांधवांना एकत्रित करण्यासाठी मराठा सेवा संघाच्या वतीने मराठा जोड़ो अभियान राबविण्यात येत आहे.संपुर्ण महाराष्ट्रभर मराठा जोडो अभियान राबवण्यात येत असून, या निमित्ताने जिजाऊ रथयात्रेचे  सोमवारी सायंकाळी कुर्डूवाडी शहरात आगमन झाले. संपूर्ण शहरातून रथयात्रेची मिरवणूक काढण्यात आली. चौकाचौकात जिजाऊ रथयात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सभा झाली. यावेळी विचार पिठावर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर, माजी आमदार विनायकराव पाटील,मराठा सेवा संघाचे राज्याचे मार्गदर्शक प्रा.अर्जून तनपुरे, उत्तमराव माने,संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक मनोजकुमार गायकवाड, दिनेश जगदाळे, जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, जिजाऊ ब्रिगेडच्या निता खटके, शिवसेना महिला आघाडीच्या आशाताई टोणपे, भा.ज.प.महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा प्रतिक्षा गोफणे, आशाताई मोरजकर, मनिषा गाडे, प्रफुल्लता मोहिते, अश्विनी गोरे, अरूणा पाटील, उमाकांत उफाडे, नितीन खटके, आनंद काशीद, तात्यासाहेब पाटील,मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अमित निमकर, तालुकाध्यक्ष निलेश देशमुख, अरूण जगताप, सर्जेराव बागल, मधुकर भोसले, सुरज मोहिते उपस्थित होते. यावेळी प्रा.अर्जून तनपुरे,मनोजकुमार गायकवाड,सचिन जगताप,हर्षल बागल,आशाताई टोणपे, प्रतिक्षा गोफणे, सचिन काळे यांची भाषणे झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुहास टोणपे,संदेश बागल, तुकाराम भोसले,सचिन महिंगडे, शिवाजीराव गवळी, बाळासाहेब वागज, शंकर नागणे,सतिश महिंगडे, प्रमोद बागल, सौरभ भोसले,प्रशांत बागल, नवनाथ कडबाने,निलेश गवळी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे माढा तालुकाध्यक्ष निलेश देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष मेजर अरूण जगताप यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुधीर क्षीरसागर यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments