किसन जाधव व नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्र.22 येथे ड्रेनेज लाईन कामाचे शुभारंभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, January 8, 2025

किसन जाधव व नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्र.22 येथे ड्रेनेज लाईन कामाचे शुभारंभ

 किसन जाधव व नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्र.22 येथे ड्रेनेज लाईन कामाचे शुभारंभ


 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या विशेष सहकार्यातून राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत सन 2023-24 या हेड अंतर्गत 8 लाख 98 हजार 692 रुपये खर्चित प्रभाग क्रमांक 22 येथील रामवाडी अंबाबाई देवी मंदिरच्या पाठीमागील परिसरात ड्रेनेज लाईन कामाचे शुभारंभ करण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून या परिसरात ड्रेनेज लाईन टाकण्याची येथील स्थानिक रहिवाशांचे मागणी होती ड्रेनेजलाईन नसल्यामुळे सांडपाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरच साचत होते यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत असल्याचे परिस्थिती होती असल्यामुळे येतील स्थानिक येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते ही गंभीर बाब लक्षात त्वरित या परिसरात ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामासाठी प्रयत्न सुरू झाले त्यानुसार या कामाचे शुभारंभ झाल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने येथील नागरिकांच्या समस्या दूर झाल्या यामुळे येथील स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे मनोगत यावेळी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी व्यक्त केलं. दरम्यान या ड्रेनेज लाईन कामाचे शुभारंभ प्रसंगी सुनिता कांबळे, मालती सारवडकर, नूरजहा शेख, सुवर्णा शितोळे, सीताबाई शितोळे,मीना बनसोडे, दीपा स्वामी, वत्सला गायकवाड, विमलताई कांबळे, सुनंदा माळंत्री, सुदर्शन माळगे, सखुबाई कांबळे, दत्तात्रय डोंगरे, सागर कांबळे, शंकर गायकवाड, बाळासाहेब शितोळे, प्रदीप गायकवाड,दीपक गायकवाड, सलीम शेख, लक्ष्मण कांबळे, शेखर कांबळे, मल्लिकार्जुन वाघमारे, धनंजय माळगे, शिवशरण दोडमणी, फिरोज पठाण, वसंत कांबळे, माणिक कांबळे, महादेव राठोड आदींच्या उपस्थितीत या ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचे विधिवत पूजन होऊन या कामाचे शुभारंभ करण्यात आले याप्रसंगी या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages