सुशिक्षित बेरोजगार स्थापत्य अभियंता यांच्या साठी लाॅटरी पद्धतीने काम वाटप
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सार्वजनिक बांधकाम विभाग सात रस्ता सोलापूर येथील कार्यालय मध्ये सुशिक्षित बेरोजगार स्थापत्य अभियंता यांच्या साठी लाॅटरी पद्धतीने काम वाटप सोमवारी करण्यात आले.
राज्य अभियंता संघटनेचे राज्य अध्यक्ष इंजि मिलिंद भोसले यांच्या विशेष प्रत्यत्नातुन जिल्हा कृषी विभागाची जिल्हा नियोजन समिती मध्ये मंजुरी मिळालेली ४५ कामे अंदाजे दोन कोटी रपयांची कामे वाटप करण्यात आली. सदर लाॅटरी काम वाटप वेळी जवळपास २५० अभियंते उपस्थित होते. अशा राज्याच्या बिकट आर्थिक परिस्थिती मध्ये निधी उपलब्ध असलेली कामे सुशिक्षित बेरोजगार स्थापत्य अभियंता यांना मिळणे हे त्यांच्या व त्यांच्या परीवारासाठी फार मोठी बाब आहे.
सदर काम वाटप सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्रीकांत गायकवाड, समीर राऊळ, वाडकर मॅडम, कृषी अधिकारी मामडीवार, कुलकर्णी तसेच राज्य अभियंता संघटनेचे कांतीलाल डुबल, कैलास लांडे, नरेंद्र भोसले उपस्थित होते.
0 Comments