Hot Posts

6/recent/ticker-posts

बसव ब्रिगेडच्या बसवरत्न पुरस्कारांची घोषणा

 बसव ब्रिगेडच्या बसवरत्न पुरस्कारांची घोषणा




कर्नाटकचे उद्योग मंत्री एम.बी पाटील यांच्या हस्ते होणार वितरण

जोल्ले दांपत्याला राज्यस्तरीय शरण दंपती पुरस्कार, जीवन गौरवसह ८ पुरस्कार

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त बसव ब्रिगेड सोलापूर शहर व जिल्हातर्फे देण्यात येणाऱ्या बसवरत्न पुरस्कार २०२५ ची घोषणा बसव ब्रिगेडचे शहर जिल्हाध्यक्ष अमित रोडगे यांनी पत्रकार परिषदेत केली.
          रविवारी दि. २१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जुळे सोलापुरातील जामगोंडी लॉन्स येथे कर्नाटकचे वाणिज्य व उद्योग पायाभूत सुविधा मंत्री एम. बी. पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बसव ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसीकर राहणार आहेत. तर विशेष पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेत्या अंजली आंबेडकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. प्रमुख पाहुणे म्हणून खा. प्रणिती शिंदे, ज्येष्ठ समाजसेवक श्रीशैल हत्तुरे, माजी आ. दिलीप माने उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील, माजी नगरसेवक किरण देशमुख, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, खलील शेख, सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, भाजपाचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, भाऊसाहेब सगरे, संतोष वायचळ, श्रीशैल रणधिरे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती राहणार आहे, असे बसव ब्रिगेडचे सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष अमित रोडगे यांनी सांगितले.
          पुरस्काराचे यंदा चौथे वर्ष आहे. फेटा, सन्मानचिन्ह, शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सोलापूर शहर जिल्ह्यातील बसवभक्तांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही जिल्हाध्यक्ष अमित रोडगे यांनी केले.
           या पत्रकार परिषदेस कार्याध्यक्ष बसवराज चाकाई, दक्षिण तालुका अध्यक्ष जतिन निमगाव, शहर सहसचिव अविनाश बिराजदार, भरत कुरणे, जुळे सोलापूर समन्वयक अमरनाथ दामा आदी उपस्थित होते.

हे आहेत पुरस्काराचे मानकरी

 यावेळी अण्णासाहेब जोल्ले आणि शशिकला जोल्ले यांना राज्यस्तरीय शरण दंपती पुरस्कार देण्यात येणार आहे. बसवराज तंबाके यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार असून लिंगायत अभ्यासक चन्नवीर भद्रेश्वरमठ, सामाजिक कार्यकर्ते राजशेखर बुरकुले, महिला प्रबोधन करणारे राहुल बिराजदार, अंतराळ विषयक संशोधन करणाऱ्या बिल्वा गिराम, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बाकळे, श्याम धुरी, रमेश वायचळ यांना बसवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच बसव सर्कलसाठी निधी उपलब्ध केल्याबद्दल मनीष काळजे, आणि अक्षय अंजिखाने यांचा विशेष सत्कार याप्रसंगी करण्यात येणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments