Hot Posts

6/recent/ticker-posts

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडे रेकॉर्डब्रेक ४१२ जण इच्छुक

 अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडे रेकॉर्डब्रेक ४१२ जण इच्छुक




उच्चशिक्षित महिलांचासुद्धा मोठा प्रतिसाद

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सोलापूर शहरात अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गुरुवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी १७५ इतक्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये तीन दिवसात तब्बल रेकॉर्डब्रेक अशा तब्बल ४१२ जणांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केल्यामुळे सोलापुरात अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीचा दबदबा असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.राष्ट्रवादी पक्षाची सोलापुरातील ताकद लक्षात घेऊन शरद पवार यांची राष्ट्रवादी, काँग्रेस, एमआयएम पक्षामधील माजी उपमहापौर तसेच माजी गटनेते माजी नगरसेवकांनी आपापल्या पक्षाला धक्का देत अजितदादा पवारांच्या पक्षाकडून महानगरपालिकेसाठी इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
    राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, माजी उपमहापौर राजेंद्र कलंत्री माजी स्थायी समिती सभापती  इब्राहिम कुरेशी माजी नगरसेवक रियाज खैरदी माजी परिवहन सभापथी राजन जाधव, माजी नगरसेविका लता फुटाणे माजी नगरसेवक विवेक खरटमल माजी नगरसेवक मृणाल पाटील माजी नगरसेवक गणेश पुजारी माजी नगरसेवक वाहेदाबी शेख माजी नगरसेवक वाहिद नदाफ, माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे,महिला कार्याध्यक्षा चित्रा कदम तसेच राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांचे बंधू हरीष बागवान यांच्यासह शेकडो इच्छुक उमेदवारांनी अजितदादा पवार राष्ट्रवादीकडून वाजत गाजत येऊन उमेदवारी अर्ज दाखल केले.
   धनंजय मुंडे समर्थक पैलवान सनी देवकते हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून प्रभाग क्रमांक  ७ मधून उमदेवारी अर्ज सादर करण्यासाठी ट्रॅक्टर चालवत धनगरी पोशाखात राष्ट्रवादी कार्यालयात आले.त्याचे सर्वांनी लक्ष वेधून घेतले.
  सोलापूर महानगरपालिकेसाठी गेल्या तीन दिवसांपासून जुनी मिल कंपाउंड येथील राष्ट्रवादी भवनात पक्षाचे शहर- जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, आनंद चंदनशिवे, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल,मकबूल मोहोळकर,महिला आघाडीच्या अध्यक्षा संगीता जोगदनकर, कार्याध्यक्षा चित्रा कदम,प्रा. श्रीनिवास कोंडी, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, माजी उपमहापौर आप्पाशा म्हेत्रे आनंद मुस्तारे, सोशल मीडिया प्रमुख वैभव गंगणे आदींनी इच्छुकांचे अर्ज स्वीकारले.
===================
इच्छुकांचा दमदार प्रतिसाद
===================
सोलापुरात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीच्या शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल ४१२ अर्ज आल्यामुळे निश्चितच विश्वास दुनावला आहे.अजितदादा पवार यांचे विकासाचे धोरण आणि व्हिजन तसेच सर्व समाजघटकाला सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न यामुळे आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत आता खऱ्या अर्थाने " अब की बार ७५ पार " शक्य होईल.निष्ठावंत कार्यकर्त्यांना आता खऱ्या अर्थाने न्याय देता येईल.
=== संतोष पवार - शहर- जिल्हाध्यक्ष - अजितदादा पवार राष्ट्रवादी, सोलापूर ===

Reactions

Post a Comment

0 Comments