Hot Posts

6/recent/ticker-posts

ग्रामस्थांनो मनावर घ्या, गाव स्वच्छ, समृध्द करा- शिवलिला पाटील

 ग्रामस्थांनो मनावर घ्या, गाव स्वच्छ, समृध्द करा- शिवलिला पाटील






पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- ग्रामस्थांनी मनावर घेतले तर अभियान यशस्वी होईल. असे आवाहन किर्तनकार शिवलीला पाटील यांनी केले.
गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान जनजागृती अभियानात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ,  उप मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल जाधव, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी भुजबळ, प्रसिध्द भारूडकार चंदाताई तिवाडी, विस्तार अधिकारी संदीप खरबस, ग्रामविकास अधिकारी वैभव आहाळे, सरपंच -पांडुरंग देवमारे, उपसरपंच सौ. कमलाक्षी गुरव सदस्य विलास मस्के ,सौ.उज्वला बनसोडे,सौ.पुष्पा बनसोडे, लक्ष्मण  लेंगरे, उदय पवार, सौ.सविता आसबे, मनीषा आसबे, विक्रम आसबे, राहुल माने, इकबाल कांबळे, गोदाबाई सूर्यवंशी, सीमा म्हेत्रे, पंचायत अधिकारी ज्योती पाटील, संध्या तिवाडी, गोपाळपूर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रमदानासाठी पुढे या. लोकांसाठी काम करा. स्वच्छतेसाठी पुढे या. स्वच्छतेचा संस्कार झाला पाहिजे. असे सांगून त्यांनी स्वत च्या आईचे उदाहरण देऊन घर दिवसातून सहा वेळा स्वच्छ करीत असल्याचे सांगून स्वच्छतेच्या कामात प्रत्येक व्यक्तींचा सहभाग हवा. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ही गावाला मिळालेली देणगी आहे. हे अभियान प्रभावी पणे राबवा. असे आवाहन किर्तनकार शिवलिला पाटील यांनी केले.
सोलापूर जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायतींनी या अभियाना प्रभावी पण काम करावे. स्पर्धा असली तर जे होणारे काम आहे ते गावांच्या हिताचे आहे. राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांचे मार्गदर्शना खाली सुरू असलेले अभियानाची प्रभावी पण अंमलबजावणी करा.
गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी पंढरपूर तालुक्यातून सर्व ग्रामपंचायती मध्ये या अभियानाची प्रभावी अमंलबजावणी सुरू आहे. सर्वांनी सहभाग घ्या असे आवाहन गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी केले.

चौकट घेणे

मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान यशस्वी करा - सिईओ कुलदीप जंगम

सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान यशस्वी करणेसाठी ग्रामस्थांनी पुढे यावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले.
सोलापूर जिल्ह्यात याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. ग्रामस्थांनी स्वच्छ , समृध्द व सक्षम पंचायत करणे साठी पुढे या. स्वच्छतेबरोबर पर्यावरण संवर्धन, लोकवर्गणी व पाण्याचे व्यवस्थापन करणे साठी पुढे या असेही आवाहन सिईओ कुलदीप जंगम यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments