दाते प्रशालेत स्वामी विवेकानंद क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- येथील डॉ. बा. ज. दाते प्रशालेमध्ये स्वामी विवेकानंद क्रीडा स्पर्धेचा भव्य उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या विद्यार्थ्यांच्या संचलनाने करण्यात आली. संचलनात विद्यार्थ्यांनी मान्यवरांना मानवंदना दिली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व सरस्वती मातेच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून नातेपुते पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी चंद्रप्रभू ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे चेअरमन राजेश चंकेश्वरा होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य विनायक देशपांडे यांनी केले.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सपोनि महारुद्र परजणे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यासावर भर न देता, खेळाच्या माध्यमातून शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती साधावी. मन, मनगट आणि मस्तक बळकट करण्यासाठी खेळाशिवाय पर्याय नाही. खेळातूनच आत्मविश्वास वाढतो आणि भावी राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय खेळाडू घडतात.”संस्थेचे सेक्रेटरी ॲड. शिवाजीराव पिसाळ म्हणाले, “दाते प्रशालेतून अधिकाधिक खेळाडू राज्य व राष्ट्रीय पातळीवर झेपावावेत, यासाठी शिक्षणसंस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. खेळाडूंच्या सर्व गरजा संस्था पूर्ण करेल. विद्यार्थ्यांनी खेळाच्या माध्यमातून आपली प्रतिभा दाखवत शाळेचे नाव उज्ज्वल करावे.”या प्रसंगी नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बाहुबली चंकेश्वरा, व्हाईस चेअरमन संतोष काळे, संचालक महेश शेटे, वर्धमान दोशी, उपप्राचार्य भारत पांढरे, प्राथमिक विभाग प्रमुख कुंडलिक इंगळे, उपमुख्याध्यापक नवनाथ बांगर, पर्यवेक्षक नीता मदने व संजय नाळे तसेच शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास काळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सतीश राऊत यांनी मानले. संपूर्ण वातावरण उत्साह, राष्ट्रभावना आणि क्रीडामय ऊर्जा याने भारलेले होते.

0 Comments