सोलापूर शहर काँग्रेस उपाध्यक्ष किरण राठोड यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश..
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आज शिवसेनेचे उपनेते माजी आमदार व संपर्क प्रमुख श्री. संजय कदमजी साहेब यांच्या हस्ते किरण राठोड यांचा जाहीर प्रवेश करण्यात आला. त्यांनी आण्णा प्रतिष्ठान च्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.तसेच त्यांनी विविध प्रकारचे आक्रमक आंदोलने करून नागरिकांना न्याय मिळवून दिले. काँग्रेस चा
एक तडफदार युवा कार्यकर्ता शिवसेनेच्या गळाला लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भविष्यकाळात शिवसेनेचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्य तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी सदैव कार्यरत राहणार असल्याचे ग्वाही किरण राठोड यांनी सांगितले.
याप्रसंगी माजी आमदार शहाजी बापू पाटील, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, शिवसेना राज्य प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे, जिल्हाप्रमुख अमर दादा पाटील, अमोल बापू शिंदे, शहर प्रमुख सचिन चव्हाण, महिला जिल्हा संपर्क प्रमुख अनिता ताई माळगे, माजी जिल्हा प्रमुख तथा नगरसेवक मनोज भाईजी शेजवाळ, माजी जिल्हा प्रमुख मनीष काळजे, अल्पसंख्यांक जिल्हा प्रमुख एजाज शेख (सर), शहर प्रमुख गफूर दादा शेख, उप शहर प्रमुख मोईन शेख, शहर जिल्हा संपर्क प्रमुख रजाक मालक मुजावर, मोहसीन शेख (नेता) आदींच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करण्यात आला.


0 Comments