Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्यातील २१ जिल्ह्यांत विशेष सिकलसेल तपासणी मोहीम राबविण्यात येणार

 राज्यातील २१ जिल्ह्यांत विशेष सिकलसेल तपासणी मोहीम राबविण्यात येणार




मुंबई (कटूसत्य वृत्त):- सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राज्यात  दिनांक १५ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत 'सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडा' राबविण्यात येणार आहे. या कालावधीत सिकलसेल आजाराचे निदान, उपचार व संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडा मोहिमेअंतर्गत राज्यातील सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या २१ जिल्ह्यांतील प्रत्येक नागरिकाची सिकलसेल तपासणी करण्यात येणार असून, एकही नागरिक सिकलसेल तपासणीपासून वंचित राहू नये, याची काटेकोर दक्षता सार्वजनिक आरोग्य विभागाकडून घेण्यात येईल.

 आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पगार प्रत्येक महिन्याच्या १ ते ५ तारखेपर्यंत अदा करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत.  दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाईल.

  तसेच जिल्हा आरोग्य संस्थांनी आवश्यकते नुसारच खरेदी करावी, अनावश्यक खर्च टाळावा व सर्व कार्यात पारदर्शकता ठेवण्याबाबत  बैठकीत सूचना दिली आहे.

या बैठकीस आरोग्य विभागाचे सचिव  ई. रवींद्रन, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड, सहसंचालिका डॉ. सुनिता गोल्हाईत, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments