आमदार बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य.... एक सप्टेंबर रोजी माढा येथे कर्मयोगी बबनराव शिंदे नेत्रालय हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ.... 5 हजार रक्त बाटल्यांचे संकलन... एक लाख वह्यांचे वाटप.... असंघटित कामगार व अपंगांचा मेळावा घेतला जाणार आमदार बबनदादा शिंदे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 21, 2023

आमदार बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य.... एक सप्टेंबर रोजी माढा येथे कर्मयोगी बबनराव शिंदे नेत्रालय हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ.... 5 हजार रक्त बाटल्यांचे संकलन... एक लाख वह्यांचे वाटप.... असंघटित कामगार व अपंगांचा मेळावा घेतला जाणार आमदार बबनदादा शिंदे

 आमदार बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य.... एक सप्टेंबर रोजी माढा येथे कर्मयोगी बबनराव शिंदे नेत्रालय हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ....

5 हजार रक्त बाटल्यांचे संकलन... एक लाख वह्यांचे वाटप.... असंघटित कामगार व अपंगांचा मेळावा घेतला जाणार 
आमदार बबनदादा शिंदे

 टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-   एक सप्टेंबर 2023 रोजी माढा येथे संकल्प फाउंडेशन ट्रस्ट संचलित कर्मयोगी बबनराव शिंदे नेत्रालय हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ होणार असून जागतिक कीर्तीचे सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने व डॉक्टर रागिणी पारेख यांच्या मार्गदर्शनाखाली हे नेत्र रुग्णालय अद्यावत होणार  आहे अशी माहिती विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे व माढेश्वरी बँकेचे अध्यक्ष आमदार बबनदादा शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे., 72 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाच हजार रक्तांच्या बाटल्यांचे संकलन, एक लाख शालेय विद्यार्थ्यांना वह्यावाटप, असंघटित कामगारांचा व अपंगांचा मेळावा इत्यादी बाबी विषयीही आमदार बबनदादा शिंदे यांनी यावेळी माहिती दिली. याप्रसंगी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वामनभाऊ उबाळे माढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रमेश पाटील, कार्याध्यक्ष रामभाऊ शिंदे मार्केट कमिटीचे उपसभापती सुहास काका पाटील जामगावकर खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष तुकाराम उर्फ बंडू नाना ढवळे जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव पाटील शंभुराजे मोरे तसेच माजी सरपंच प्रमोद कुटे, संतोष पाटील, दत्ता सुर्वे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते .
         या नेत्र रुग्णालयाविषयी अधिक माहिती देताना आमदार बबनदादा शिंदे म्हणाले की माढा येथील सुप्रसिद्ध समाजसेवक स्वर्गीय डॉक्टर रमण दोशी यांचे संमती नर्सिंग चॅरिटेबल हॉस्पिटल सध्या बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटल ट्रस्टचे वतीने चालवण्यात येत आहे, या ट्रस्टचे प्रमुख डॉक्टर यादव यांनी काहीही भाडे न आकारता तीन वर्षासाठी या ठिकाणी  कर्मयोगी बबनराव शिंदे  रुग्णालय सुरू करण्यास मान्यता दिली आहे व या नेत्र रुग्णालयाचा भव्य शुभारंभ एक सप्टेंबर रोजी या ठिकाणी करण्यात येणार आहे. या रुग्णालयासाठी 80 लाख रुपयांच्या अध्यायावत मशिनरी व साहित्य सध्या उपलब्ध असून भविष्यात यासाठी दोन ते अडीच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे ,त्यामुळे गावोगावच्या नागरिकांनी तसेच वैयक्तिक दानशूर व्यक्तींनी यासाठी मदत करावी व संकल्प फाउंडेशन ट्रस्ट च्या माढेश्वरी बँकेतील खात्यावर रोख रक्कम किंवा चेकने ऑनलाईन  मदत पाठवावी असे आव्हान यावेळी आमदार बबनदादा शिंदे यांनी केले आहे.
 255 नेत्र शस्त्रक्रियांचा संकल्प......
 अधिक माहिती देताना आमदार बबनदादा शिंदे म्हणाले की एक सप्टेंबर रोजी प्रसिद्ध  नेत्रतज्ञ पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने, डॉक्टर रागिणी पारेख व त्यांचे बरोबर पंधरा नेत्रतज्ञ डॉक्टरांची टीम येणार असून शुक्रवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी रुग्णांची नेत्र तपासणी, शनिवार दिनांक 2 व रविवार दिनांक तीन रोजी नेत्र शस्त्रक्रिया व तीन तारखेलाच समारोप होणार आहे. यावेळी ज्या व्यक्तींचे डोळे आले असतील त्यांनी या ठिकाणी येऊ नये असे डॉक्टर लहाने आणि कळवले असल्याचेही आमदार बबनदादा शिंदे यांनी आवर्जून सांगितले., या शुभारंभ प्रसंगी 255 रुग्णावर नेत्र शस्त्रक्रिया करण्याचा संकल्प असल्याचेही दादांनी स्पष्ट केले .
..5000 रक्त बाटल्या जमा करण्याचा संकल्प...
        वाढदिवसाच्या  औचित्याने 21 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर अशा सलग दहा दिवसात संपूर्ण माढा तालुक्यातील 109 गावे माढा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या पंढरपूर तालुक्यातील 42 गावे व माळशिरस तालुक्यातील 14 गावे येथे प्रत्येक गावात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, साखर कारखान्याचे कर्मचारी ,कार्यकर्ते व गावोगावच्या पदाधिकारी व नागरिकांच्या सहकार्याने एकूण पाच हजार रक्त बाटल्यांचे संकलन करण्याचे नियोजन असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
... एक लाख वह्यांचे वाटप ...
आमदार बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मतदार संघातील गावागावातून शालेय विद्यार्थ्यांना एकूण एक लाख वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे .
...असंघटित कामगारांचा मेळावा....
आ.बबन दादा शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्याने जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीत उर्फ भैयासाहेब शिंदे यांचे नियोजनाप्रमाणे टेंभुर्णी व परिसरातील असंघटित कामगारांचा मेळावा घेण्यात येणार आहे. यामध्ये गवंडी सुतार लोहार बिगारी सेंट्रींग कर्मचारी इत्यादी सर्व प्रकारच्या असंघटीत कामगारांचा टेंभुर्णी येथे भव्य मेळावा आयोजित केला आहे. यामध्ये टेंभुर्णी, बेंबळे ,कोंढार भाग व परिसरातील असंघटित कामगारांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. यासाठी कामगारांनी आधार कार्ड रेशन कार्ड आणणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे अशा असंघटित कामगारांना व त्यांच्या पाल्यांना शिक्षण, लग्न, गंभीर आजार ,घरकुल आदी  विविध प्रकारचे शासनाकडून अर्थसहाय्य मिळणार आहे.
.... अपंगांचा मेळावा...
 आमदार बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अपंगांचा टेंभुर्णी येथे मेळावा घेण्यात येणार आहे, या मेळाव्यामध्ये जयपूर फूट हँड्स बूट अशा आवश्यक साहित्याचे अपंगांना वाटप करण्यात येणार आहे.
.... चौकट ...
माढा येथे दोन एकर क्षेत्रात ,सभोवतालच्या पाच जिल्ह्यातील  नेत्र रुग्णांच्यासाठी सर्व प्रकारचे अध्ययवत उपचार करण्याच्या नियोजनानुसार भव्य असे पाच कोटी रुपये खर्चाचे कर्मयोगी बबनदादा शिंदे नेत्रालय उभारण्याचा संकल्प ट्रस्टचा मानस असल्याचे प्रतिपादन माढेश्वरी बँकेचे उपाध्यक्ष अशोक लुणावत यांनी दूरध्वनी वरून सांगितले.

 चौकट.... सत्काराचे पैसे ट्रस्टला द्या
 माझा एक सप्टेंबर 23 रोजी वाढदिवस आहे, मी आज पर्यंत माझ्या वाढदिवसाच्या दिवशी कधीही मतदारसंघात थांबत नसतो, परंतु यावर्षी माढा येथे  नेत्रालय हॉस्पिटलचा शुभारंभ होत असल्यामुळे मी थांबणार आहे ,परंतु या दिवशी माझ्यासाठी हार, तुरे  शाल, श्रीफळ आदी कोणतीही बाब मी स्वीकारणार नाही, माझ्यावर प्रेम करणाऱ्या हजारो - लाखो नागरिकांनी माझ्या सत्काराच्या खर्चाची रक्कम नेत्रालया साठी मदत म्हणून द्यावी असे मी विनम्र आव्हान करतो......
 आमदार बबनदादा शिंदे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages