सेवा निवृत्तीचा इतिहास पुस्तकात मांडणारे डॉ. रामप्रकाश पंजाबी ‘अॅक्युसॅट’ संघटनेवरील पुस्तकाचे नागपुरात भव्य विमोचन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, February 5, 2026

सेवा निवृत्तीचा इतिहास पुस्तकात मांडणारे डॉ. रामप्रकाश पंजाबी ‘अॅक्युसॅट’ संघटनेवरील पुस्तकाचे नागपुरात भव्य विमोचन

 सेवा निवृत्तीचा इतिहास पुस्तकात मांडणारे डॉ. रामप्रकाश पंजाबी

‘अॅक्युसॅट’ संघटनेवरील पुस्तकाचे नागपुरात भव्य विमोचन


सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- सोलापूर सोशल कॉलेजचे सेवा निवृत्त ग्रंथपाल डॉ. रामप्रकाश अमीरचंद पंजाबी (धिंग्रा) यांनी महाराष्ट्रातील सेवा निवृत्त प्राध्यापकांच्या संघटनेवर सविस्तर संशोधनात्मक पुस्तक लिहून एक महत्त्वपूर्ण साहित्यिक व शैक्षणिक योगदान दिले आहे. ‘अॅक्युसॅट’ (Association of College and University Superannuated Teachers – Maharashtra) या संघटनेच्या कार्याचा इतिहास, उद्दिष्टे व वाटचाल मांडणाऱ्या या पुस्तकाचे अलीकडेच नागपूर येथे विमोचन झाले.

अॅक्युसॅट संघटनेची १३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २१ डिसेंबर २०२५ (रविवार) रोजी वानखेडे सेलिब्रेशन हॉल, कळमण, नागपूर येथे संपन्न झाली. या सभेस महाराष्ट्राच्या विविध भागांतून तब्बल ९५ सेवा निवृत्त प्राध्यापकांनी उपस्थिती लावली होती. याच महत्त्वपूर्ण सभेमध्ये डॉ. पंजाबी यांनी लिहिलेल्या ‘अॅक्युसॅट’ या पुस्तकाचे औपचारिक विमोचन करण्यात आले.


सध्या अॅक्युसॅट संघटनेचे अध्यक्ष डॉ. वाहूळ एम.ए., सचिव प्राचार्य डॉ. मंत्री जे.एम., खजिनदार प्राचार्य नाफडे एस.बी., ट्रस्टी प्राचार्य मोहमद शफी असे पदाधिकारी आहेत.

डॉ. रामप्रकाश पंजाबी यांनी हे पुस्तक स्वतःच्या खर्चाने प्रकाशित करून सभेत १०० प्रती विनामूल्य वितरित केल्या. सेवा निवृत्त प्राध्यापकांमध्ये संघटनेचा प्रसार व प्रचार व्हावा, तसेच नव्या पिढीला या चळवळीचा इतिहास समजावा, हाच या उपक्रमामागचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

या पुस्तकाची मूळ किंमत ६०० रुपये असून, सध्या ५० टक्के सवलत दरात उपलब्ध करून देण्यात येत आहे. शैक्षणिक, सामाजिक व संघटनात्मक अंगांनी परिपूर्ण असलेले हे पुस्तक सेवा निवृत्त प्राध्यापकांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहे, अशी प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही शिक्षणक्षेत्राशी निष्ठा ठेवून लिखाणाच्या माध्यमातून योगदान देणाऱ्या डॉ. पंजाबी यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages