भाजपाच्या पाठीशी राहून विकास कामासाठी संधी द्या : अक्षय खताळ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 3, 2026

भाजपाच्या पाठीशी राहून विकास कामासाठी संधी द्या : अक्षय खताळ

 भाजपाच्या पाठीशी राहून विकास कामासाठी संधी द्या : अक्षय खताळ 



कुरुल (कटूसत्य वृत्त):- नरेंद्र मोदींच्या शक्तिशाली नेतृत्वाखाली व देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या अभ्यासू व्यक्तिमत्वामुळे महाराष्ट्राचा न भूतो न भविष्यती असा सुजलाम विकास झाला आहे. राज्यामध्ये रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य अशा सर्वच सोयी सुविधा होत असताना महाराष्ट्र एका वेगळ्या उंचीवर पोहचला आहे. विद्यार्थी, लाडक्या बहिणी, शेतकरी यांना थेट योजना पोहचविण्यासाठी सरकार अथक प्रयत्न करत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्राचा अजून भरीव विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या आणि जि.प. उमेदवार विमलताई खताळ, पं.स. उमेदवार कोमल आवताडे यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे रहा असे आवाहन युवा नेते अक्षय खताळ यांनी केले आहे. 

कामती व परिसरातील गावामध्ये प्रचार रॅली आयोजित केली होती. यावेळी मतदारांशी संवाद साधत असताना ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले कि, कामती भागात माझे वडील स्व. तानाजीआण्णा खताळ यांनी प्रतिनिधित्व केले आहे. यावेळी त्यांच्याकडून मतदारसंघात वेगवेगळी विकासकामे झाली आहेत. मात्र त्यांच्या स्वप्नातील मतदारसंघ घडवायचा आहे. आणि त्यासाठी घराघरातील महिला, खांद्याला खांदा लावून झटणारे युवक, वयोवृद्ध आपल्या सर्वांची साथ आणि आशीर्वाद पाहिजे असे भावनिक आवाहन त्यांनी शेवटी केले.

▪️चौकट
मतदारांचा प्रचंड प्रतिसाद आहे
- कामती मतदार संघात गेल्या महिनाभरापासून प्रचाराच्या निमित्ताने गावाकऱ्यांच्या गाठीभेटी घेत असताना त्यांचे आशीर्वाद स्वीकारत असताना जनतेने खुप आदराने स्वागत केले आहे. कारण स्व. तानाजी आण्णा यांची नाळ इथल्या मातीशी, इथल्या प्रत्येक नागरिकांशी जोडली आहे. त्यामुळे कामती गटात चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-विमलताई तानाजीराजे खताळ
जि.प. उमेदवार कामती गट

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages