आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने श्री संत गजानन महाराजांच्या पालखीतील 700 वारकऱ्यांना दैनंदिन जीवन उपयोगी साहित्याचे किट वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 18, 2026

आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने श्री संत गजानन महाराजांच्या पालखीतील 700 वारकऱ्यांना दैनंदिन जीवन उपयोगी साहित्याचे किट वाटप

 आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने श्री संत गजानन महाराजांच्या पालखीतील 700 वारकऱ्यांना दैनंदिन जीवन उपयोगी साहित्याचे  किट वाटप
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-आज दिनांक 18 जुलै 2026 रोजी श्री संत गजानन महाराज यांची पालखी शेगाव येथून निघून पायी प्रवास करत प्रभाकर महाराज मंदिर येथे आगमन झाले तेथून निघून सम्राट चौक,बाळीवेस,चाटी गल्ली,पूर्व मंगळ पेठ भुसार गल्ली जैन मंदिर या ठिकाणी आगमन झाल्यानंतर आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने प्रथम गजानन महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून  फुलांचा वर्षाव करुन दिंडीतील पायी चालणाऱ्या 700 वारकऱ्यांना त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी जीवन उपयोगी साहित्याचे साबण ,तेल, टूथपेस्ट, बुश पावडर, झेंडू बाम, अंगाला लावायचे साबण, सुमो स्प्रे, नॅपकिन टावेल इ.किट वाटप पूर्व मंगळवार पेठ या ठिकाणी, आनंद तालिकोटी ( अध्यक्ष आस्था सामाजिक संस्था)  सुहास छंचुरे ( प्रसिद्धी प्रमुख) वेदांत तालिकोटी,   ( संचालक आस्था सामाजिक संस्था) राम क्षीरसागर   यांच्या हस्ते किट वाटप करण्यात आले. 
प .
याप्रसंगी  अध्यक्ष आनंद तालिकोटी यांनी आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने वाटप करण्यात आलेल्या दैनंदिन जीवनातील साहित्याचा वाटपाबादद्दल सामाजिक बांधिलकी जोपासत आस्था सामाजिक संस्था सामाजिक कार्यात नेहमी कार्यरत असते हे कार्य पुढेही चालू ठेवणार आहे
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरज छंचुरे अथर्व शिंदे,यश तालिकोटी, अथर्व कोळुरे, वेदांत तमशेट्टी, श्रेयस कोळुरे, संदेश शेरीकर,बसवराज बेऊर,राज बेऊर,आकाश वाघमारे, प्रथमेश व्हड्राव ,अप्पा साखरे, प्रमोद छंचुरे यांनी परिश्रम घेतले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages