Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्ह्यात भूमी अभिलेख कार्यालयांमार्फत 3416 प्रकारची कागदपत्रे नागरिकांना वितरीत शासनाला 30 लाख 15 हजार 893 रुपयांचा महसुल जमा

जिल्ह्यात भूमी अभिलेख कार्यालयांमार्फत3416 प्रकारची कागदपत्रे  नागरिकांना वितरीतशासनाला 30 लाख 15 हजार 893 रुपयांचा महसुल जमा



सोलापूर, दि.७(क.वृ.): जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख व अधीनस्त कार्यालयांमार्फत नागरिकांना जून महिन्यात विविध प्रकारचे मागणी अर्जानुसार 3416 कागदपत्रांच्या प्रमाणीत नकला, मिळकतपत्रिका वितरीत करण्यात आल्या आहेत. या नकला, कागदपत्रे वितरीत करण्यापोटी व मोजणी फीपोटी नागरिकांकडून 30 लाख 15 हजार 893 रुपयांचा महसुल जमा झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अधीकारी हेमंत सानप यांनी आज दिली.
नागरिकांना जमिनीच्या व घरजागेच्या संबंधी विविध कागदपत्रे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय आणि त्यांच्या अखत्यारीतील 11 तालुक्यातील उप अधीक्षक भूमी अभिलेख आणि नगर भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयाकडून वितरीत होतात. या कार्यालयांकडे घरजागाच्या हस्तांतरण फेरफाराच्या आणि वारसानोंदी होतात. लॉकडाऊनच्या कालावधीत कर्मचारी कमी असल्यामुळे या कामात थोडीशी शिथीलता आली होती. मात्र जून महिन्यात नागरिकांना आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे वेळेत उपलब्ध करुन देण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या. हे काम करत असताना प्रत्येक कार्यालयात कोरोना विषाणूच्या प्रसाराला रोखण्यासाठी राज्यशासनाच्या सूचनांचे काटेकोर अंमलबजावणी केली जावी. याबाबतही कळविण्यात आले होते. त्यानुसार सर्व तालुक्यातील उप अधीक्षक कार्यालय आणि शहरातील नगर भूमापन कार्यालयात कामकाज सुरु करण्यात आले आहे.
या कार्यालयाकडून मोजणी विषयक  कामकाजाला सुरुवात करण्यात आली आहे. मोजणीपोटी जून मध्ये 29 लाख 15 हजार 250 रुपये महसुल जमा झाला. कागदपत्राच्या  नक्कल शुल्क पोटी 89 हजार 221 रुपये  तर नकाशा फी विक्री पोटी 11 हजार 422 रुपये असे 30 लाख 15 हजार 893 रुपायांचा महसुल शासन दरबारी जमा झाला.अशी माहिती श्री.सानप यांनी दिली.
Reactions

Post a Comment

0 Comments