Hot Posts

6/recent/ticker-posts

लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी 42.47 कोटी रुपयांचे कर्ज वितरीत बँक ऑफ इंडियाची विशेष कर्ज योजनेतून उद्योजकांना पतपुरवठा : विभागीय व्यवस्थापक कडू

लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी 42.47 कोटी रुपयांचे कर्ज वितरीत

  बँक ऑफ इंडियाची विशेष कर्ज योजनेतून उद्योजकांना पतपुरवठा 

- विभागीय व्यवस्थापक कडू



सोलापूर,दि.७(क.वृ.): कोरोना विषाणूमुळे ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी  बँक ऑफ इंडियाने सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी 100 कोटी कर्ज देण्याचे निश्चित केले आहे. सोलापूर विभागात येणाऱ्या 84 शाखांमधून हे कर्ज वितरीत केले जाईल, अशी माहिती बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर अजय कडू यांनी दिली आहे. या योजनेतून आत्तापर्यंत 3443 खातेदारांना 42.47 कोटी रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.
कोरोना विषाणूमुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. या क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढून अर्थव्यवस्था पुन्हा एकदा गतिमान करण्यासाठी बँक ऑफ इंडियाने  स्टार गॅरंटीड इमरजेंसी क्रेडिट लाइन योजना लागू केली आहे. या योजनेतून जुलै अखेर 100 कोटी रुपयांचे कर्ज वितरीत केले जाणार आहे.  हे कर्ज व्यापारी ,उद्योजक यांना दिले जाईल. आत्तापर्यत 8646  उद्योजक यांना 81.06 कोटी रुपयाचे कर्ज मंजूर करण्यात आले असून 42.47 कोटी रुपयांचे कर्ज प्रत्यक्ष वितरीत करण्यात आले आहे.  याचबरोबर वैयक्तिक कर्ज कोविड कृषी कर्ज, कोविड स्वयंसहायता कर्ज अशा योजनाही बँक ऑफ इंडिया मार्फत देण्यात येत आहेत, अशी माहिती श्री.कडू यांनी दिली.
Reactions

Post a Comment

0 Comments