देवीमातेची आरती जोगधनकर यांच्या हस्ते
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- जुळे सोलापूर भागातील सुभाष नगर येथील महालक्ष्मी तरूण मंडळाच्या देवीमातेची आरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर अध्यक्षा संगीता जोगधनकर यांच्या हस्ते करून प्रमुख पाहुण्यांनी देवीचे आशिर्वाद घेतले. या प्रसंगी मंडळाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.मंडळाचे संस्थापक गौरीशंकर चौगुले, अध्यक्ष सचिन (भैय्या) चौगुले, उपाध्यक्ष श्रीपाद वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या सोहळ्यात सौ. मंजूषा हंचाटे, सारिका बिराजदार यांचे सहकार्य लाभले.
मंडळाचे आधारस्तंभ विश्वनाथ (मालक) चौगुले यांच्यासह व्यवस्थापक महेश (भैय्या) जाधव, अप्पासाहेब अंगडी, खजिनदार संतोष स्वामी व महेश पाणी, पूजा व्यवस्थापक राम कोळी व सुनील हंचाटे यांनी आयोजनात मोलाची भूमिका बजावली.
तसेच कार्यक्रम प्रमुख लकी पाटील, अमोल कारंडे, लेझीम प्रमुख समर्थ गरजे व विरेश स्वामी यांनी विशेष उत्साहात सहभाग घेतला. सचिव सिद्धाराम पाटील व दिनेश स्वामी यांच्यासह सिद्धाराम चौगुले, विकास धायगुडे, सिद्धाराम विंचुरे, अनिल स्वामी, अनिल ख्याड, बाबुराव पाटील, संजय हत्तुरे, उमेश चांडोले, लिंगराज ख्याड, वीरभद्र स्वामी, सिद्धाराम स्वामी, मल्लिकार्जुन मायनाळे तसेच महिलांची लक्षणीय उपस्थिती लाभली.या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमामुळे परिसरात मंगल वातावरण निर्माण झाले.

0 Comments