योगीनाथ पतसंस्था सावकारी नाही,
सेवा करते फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पतंगे
२८ वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली,
सभासदांना वार्षिक लाभांश १२ % जाहीर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-योगिनाथ सभागृह नवीन वास्तूमध्ये शेळगी २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २५ सप्टेंबर २०२५ गुरुवार रोजी दुपारी ४ :३० वाजता कार्यक्रमाची सुरुवात सिद्धेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप पतंगे, प्रमुख पाहुणे उदगिरी सी.ए. संस्थापक चंद्रकांत रमणशेट्टी चेअरमन महेश ठेसे, व्हाईस चेअरमन महादेव जावळे., संचालक सुनील पुजारी, डॉक्टर नारायण नायडू, आप्पाराव विभूते, सिद्राम मंठाळकर, डॉक्टर राजीव मठ, चंद्रकांत जडगोणार , संचालिका सुनंदा जावळे, अरुणा ढगे नागनाथ गुडंमी मॅनेजर व्यासपीठावर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात योगीनाथ पतसंस्था आज सावकारी नव्हे तर सेवेच्या माध्यमातून यशाच्या शिखरावर पोहोचल्याचे सांगितले. आजपर्यंतच्या वाटचालीत सभासदारासाठी बांधिलकी व सेवाभाव जोपासून सोलापूर जिल्ह्याच्या विकासात मोलाचे योगदान देत असल्याचे प्रतिपादन फेडरेशनचे अध्यक्ष सहकार रत्न दिलीप पतंगे यांनी योगिनाथ पतसंस्थेच्या 28 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना म्हणाले की सभासद तरुण असणे आवश्यक आहे. सर्व सभासदांचे वय हे 50 च्या पुढे आहे. ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी पतसंस्थेने नवनवीन योजना आखल्याचे व त्यांची अंमलबजावणी योग्य प्रकारे केली त्यामुळे देशभरात पतसंस्थेचा लौकिक झाला सामान्य माणसाच्या चुलीशी नाते निर्माण केले आहे हे नाते आपणाला टिकवायचे आहे ते अधिक दृढ करायचे आहे त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपणाला आणखीन या भागात समृद्धी आणायची आहे. संस्थापक चंद्रकांत रमणशेट्टी याने विचार व्यक्त करताना 392 सभासद घेऊन ही पतसंस्था चालू केली. आज 1685 सभासद संख्या झाली आहे. कमी भाग भांडवलामध्ये पतसंस्था चालू करण्यात आली. या संस्थेचा वेलू वाढत आहे हे पाहून मला मनस्वी आनंद होत आहे. चेअरमन महेश ठेसे याप्रसंगी सर्व सभासद ठेवीदार खातेदार कर्जदार यांचे आभार मानले येणाऱ्या काळामध्ये जुने बिडी घरकुल येथे पतसंस्थेचे दुसरी शाखा लवकरच काढण्यात येईल असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील पुजारी महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक यांनी केले. आभार प्रदर्शन व्हाईस चेअरमन महादेव जावळे यांनी मांनले. या सभेसाठी महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते, सभासद, ठेवीदार, खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम च्या यशस्वीतेसाठी पतसंस्थेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

0 Comments