अर्धा महाराष्ट्र बुडाला, मराठी कलाकार काय करतायत ?
इकडं महाराष्ट्राच्या बहुतांश भागावर निसर्गाचा कोप झालाय. गावच्या गावं बुडाली, लोक-जनावर मेली, शेतकरी उध्वस्त झाला, संसार उघड्यावर आले, महापुराने सगळं हिरावून नेलं. आणि या मराठी अभिनेत्री निसर्गाचा आनंद घेऊन ते लोकांना सांगण्यात धन्यता मानतायत.
मुद्दा महाराष्ट्रातल्या स्थितीमुळे तुम्ही कायम शोक करावा असा नाही पण तुमच्या भोवताली, तुमच्या लोकांसोबत इतकं दुःखद काहीतरी घडतंय आणि याच तुम्हाला सोयर सुतक सुद्धा नाही हा मुद्दा आहे. ज्या जनतेनी तुमच्यावर कलाकार म्हणून प्रेम केलं त्या जनतेच्या दुःखाची जाणीव तुम्हाला माणूस म्हणून नसणं हे लाजिरवाण आहे.. मीठ-पीठ सुद्धा घरात शिल्लक नाही, ज्या शेतीच्या जीवावर पिढ्या तगल्या ती शेती सुद्धा वाहून गेली. फक्त दगड धोंडे उरले आहेत. या आपल्या लोकांबद्दल सहवेदना प्रकट करायचं सोडून या ताई पाचगणी मध्ये योगा करतायत आणि वरून त्याचे फोटो मिरवतायत...
यात त्यांनी Perfect escape असं लिहिलंय..
बरोबर आहे.. या महाराष्ट्रापासून एस्केप शोधतायत, संकटांपासून पळतायत, लोकांच्या दुखापासून पळतायत,सामाजिक बांधिलकी, प्रेम, करूणा, दया, सामान्यांच दुःख यापासून पळतायत... मग Escape बरोबरच आहे.. आणखी काही अभिनेत्री आहेत... ज्या 'सेलिब्रेशन' मोड मध्ये आहेत... महाराष्ट्र आक्रोश करत असताना त्याचा परिणाम स्वतःवर न होऊ देता तुम्ही या सगळ्या गोष्टींबद्दल डोळे बंद करून, कानावर घट्ट हात ठेवून तुमच्या आयुष्याचा आनंद तुम्ही घेताय.. चांगली गोष्ट आहे....हे सगळं न करण्याने परिस्थिती बद्दलली नस्तीच.. पण परिस्थितीच तुम्हाला भान आहे हे दिसलं असत..
तुमच्यावर प्रेम करणारी माणसं देशोधडीला लागलेली असताना तुम्ही खारीचा तरी वाटा उचलून एक जबाबदारी पार पाडणं अपेक्षित होतं.. निदान मदतीच आवाहन, सहवेदना प्रकट करणं अपेक्षित होत... पण तुम्ही महाराष्ट्र बुडालेला असताना स्वतःच्या सोशल मीडियावर जाहिरात करता, हस्ते फोटो टाकता, नट्टा पट्टा करता...या कोडगेपणाची कमाल आहे...
मराठी माणूस जगला तरच मराठी चित्रपट चालणार आहेर..
थोडी जरी लाज शिल्लक असेल तर 'आमचा चित्रपट बघायला या' अश्या भिका मागायला परत मराठवाडा विदर्भात हात पसरवू नका...
- सौरभ कोरटकर



0 Comments