सोलापूर महापालिका निवडणुकीत संयुक्त विकास आघाडी सर्व जागा लढविणार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहराच्या विकासासाठी सहा पक्षांनी एकत्र येऊन संयुक्त विकास आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीच्या माध्यमातून सोलापूर महापालिका निवडणुकीत सर्व जागा लढविण्यात येणार आहेत, अशी माहिती ॲड. विक्रम कसबे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जनविकास क्रांतीसेना, भारतीय काँग्रेस पक्ष, लेबर पार्टी, समाजवादी पक्ष, आरपीआय डेमोक्रॅटिक पक्ष, जनशक्ती काँग्रेस पक्ष हे सहा पक्ष एकत्र येऊन ही आघाडी करण्यात आली आहे. सोलापूर महापालिकेत सुमारे साडेतीन वर्ष प्रशासकीय राजवट होती. त्यानंतर अचानकपणे महापालिकेच्या निवडणुका लादल्या गेल्या आहेत. शहराचा विकास गेल्या अनेक वर्षापासून खुंटला आहे. अनेक आघाड्यांनी सोलापूर महापालिकेवर सत्ता भोगली मात्र विकासाकडे दुर्लक्ष झाले. सोलापूर शहर स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जाते मात्र यामध्ये केवळ पैशाचा चुराडा झाला आहे, असा आरोप विष्णू कारमपुरी यांनी केला आहे.
या पत्रकार परिषदेस एम.डी. शेख, साथी बशीर अहमद शेख, इमाम खान, बाळासाहेब गायकवाड, अंगद जाधव आदी उपस्थित होते.

0 Comments