Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री. आदी जांबमुनी महाराज जयंती निमित्त सोमवारी रथोत्सव मिरवणूक

श्री. आदी जांबमुनी महाराज जयंती निमित्त सोमवारी रथोत्सव मिरवणूक 

डॉलब्याऐवजी पारंपारिक वाद्यांना देणार प्राधान्य 
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जांबमुनी मोची समाजाचे कुलदैवत श्री. आदी जांबमुनी महाराज जयंती निमित्त रथोत्सव मिरवणुक समाजाचे धर्मगुरू वैकुंटवासी ह. भ.प. गुरुदास तोडमे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि. 22 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता रेल्वे स्टेशन येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून काढण्यात येणार आहे. डॉल्बी मुक्त ही मिरवणूक राहणार आहे, अशी माहिती शहर जिल्हा जांबमुनी मोची समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र भंडारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
          जांबमुनी मोची समाजाचे ऐक्य व सामाजिक परिवर्तनाच्या माध्यमातुन ही रथोत्सव मिरवणुक गेली 30 वर्षांपासून काढण्यात येत आहे. रविवार दि. 21 डिसेंबर 2025 रोजी रथोत्सव मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष शाम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली व शहर जिल्हा जांबमुनी मोची समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र भंडारे व युवक अध्यक्ष रतिकांत कमलापुरे यांच्या सहकार्याने रुपाभवानी मंदिर येथे सकाळी 9 वाजता ज्योत रॅली काढण्यात येणार आहे. या ज्योत रॅली मध्ये समाजाचे खेळाडू सहभागी होणार आहेत. ही ज्योत रॅली छत्रपती शिवाजी महाराज चार हुतात्मा पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन महात्मा गांधी पुतळा, जगजीवनराम वस्ती, सोनी नगर, जांबमुनी सांस्कृतिक भवन येथे समारोप होणार आहे.
        सोमवार दि. 22 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता महात्मा गांधी  पुतळ्यापासून जांबमुनी मोची समाज रथोत्सव मिरवणुकीची सुरुवात खा. प्रणिती शिंदे, आ. देवेंद्र कोठे, आ. सुभाष देशमुख, आ. विजयकुमार देशमुख, माजी आ. प्रकाश यलगुलवार, माजी आ. नरसय्या आडम , मोची, मादिगा, मादरु महासंघ प्रदेशाध्यक्ष मारुती आण्णा पंद्री,  अध्यक्ष बाबु कोंकल, मल्लेश कणकम व आजी माजी लोकप्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ही मिरवणुक महात्मा गांधी पुतळा, कोनापुरे चाळ, फॉरेस्ट, जुना एम्पलायमेंट चौक, मोदी पोलीस चौकी, जगजीवनराम वस्ती, सात रस्ता, जगदंबा चौक, मौलाली चौक, महावीर चौक, सतनाम चौक, सिध्दार्थ चौक, बापुजी नगर येथील मारुती मंदिर येथे विसर्जीत होणार आहे.
           तसेच स्वागत नगर, बापुजी नगर, लष्कर कोनापुरे चाळ, मोदी या भागात रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. 21 डिसेंबर रोजी जांबमुनी मोची समाज सेवा मंडळ वतीने जांबमुनी महाराज यांची मुर्तीची महापुजा करण्यात येणार आहे.  विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवुन जयंती मोठ्या उत्सहात जयंती साजरी करण्यात येणार आहे, असे जांबमुनी मोची समाज रथोत्सव मध्यवती समितीचे अध्यक्ष शाम म्हेत्रे यांनी सांगितले. 
        या पत्रकार परिषदेस दिनेश म्हेत्रे, करेप्पा जंगम, मारेप्पा कंपली , नरसिंग आसादे, नागनाथ कासोलकर, हनुमंत सायबोलू , सिद्राम कामाठी , बसवराज म्हेत्रे,  रविकांत कमलापुरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments