Hot Posts

6/recent/ticker-posts

हार्टफुलनेस संस्थेतर्फे रविवारी ऑनलाईन ध्यान सत्राचे आयोजन

 हार्टफुलनेस संस्थेतर्फे रविवारी ऑनलाईन ध्यान सत्राचे आयोजन 

सोलापूर  (कटूसत्य वृत्त):- जागतिक ध्यान दिनानिमित्त

 हार्ट फुलनेस या आध्यात्मिक संस्थेच्या वतीने रविवार दि. 21 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8 ते 8.20 या कालावधीत ऑनलाईन ध्यान सत्राचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रमोद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

        पद्मभूषण कमलेश पटेल हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑनलाईन ध्यान सत्र होणार आहे. हे सत्र पूर्णतः मोफत असून आत्तापर्यंत शंभरहून अधिक देशांमधील 15 लाखापेक्षा जास्त लोकांनी

 नोंदणी केली आहे. युट्युब या माध्यमातून थेट प्रसारित करण्यात येणार आहे. htttps://meditationday.global/en या लिंक वर नोंदणी करावी, असे आवाहन प्रमोद पाटील यांनी केले आहे.

       या पत्रकार परिषदेस विनोद कोल्हापूरे, चंद्रमोहन इंदापुरे , पवन टीकंद उपस्थित होते.


Reactions

Post a Comment

0 Comments