डी. एच. बी. सोनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे आयसीएआय कॉमर्स क्विज़ ( प्रश्नमंजुषा) २०२० मध्ये घवघवीत यश
सोलापूर (क .वृ ):- आयसीएआय, नवी दिल्ली यांच्या वतीने २९ जून २०२० रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील कॉमर्स क्विज़ ( प्रश्नमंजुषा) कॉम्पिटिशन २०२० मध्ये सोलापूर येथील डी. एच. बी. सोनी कॉलेजच्या ४ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले यामध्ये अनुजा आमणे (६५), योगीराज ठोंबरे (६५), शोबित तोष्णीवाल(५९), ब्रजेश भुतडा (५५) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यापैकी अनुजा आमणे , योगीराज ठोंबरे यांनी सोलापूर जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळविला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना आयसीएआय, नवी दिल्ली यांचेकडून प्रशस्तीपत्र मिळणार आहे.
इयत्ता ९ वी ते १२ वी विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी आयसीएआयच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. अकाउंट, कॉमर्स, इकॉनॉमिक्स, मॅथेमॅटिक्स या विषयावर आधारित ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये कॉमर्स शाखेविषयी अभिरुची व ज्ञान वाढविण्यासाठी आयोजित केली जाते.
विद्यार्थ्यांमधील प्रतिभा व उपजत कौशल्य यांची ओळख करून देणे व स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची प्रगती साधणे या उद्देशाने ही स्पर्धा घेतली जाते. सदर परीक्षेत डी. एच. बी. सोनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वासंती अय्यर, उपप्राचार्या हरदीप बोमरा, कॉमर्स विभागाचे सर्व शिक्षक यांच्याकडून मार्गदर्शन मिळाले व त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
संस्थेचे अध्यक्ष मा. श्री लक्ष्मीकांतजी सोमाणी, सचिव श्री आनंदजी भंडारी , उपसचिव श्री मधुसूदनजी करवा, सदस्यश्री सचिनजी भट्टड, सदस्य श्री सुनील माहेश्वरी व इतर व्यवस्थापन समिती सदस्यांनी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
1 Comments
Great Congratulations....!!!
ReplyDelete