पंढरपूर सिंहगड मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाचा ऑनलाईन पालक मेळावा संपन्न
○ ऑनलाईन मेळावा आयोजित केल्याबद्दल पालकांकडून सिंहगड महाविद्यालयाचे कौतुक
पंढरपूर: (क.वृ ):- कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात मंगळवार दि. ७ जुलै रोजी दुपारी दोन वाजता ऑनलाईन पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता.
सद्या सर्वञ कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने संचार बंदी घालण्यात आली आहे. या कालावधीत पालकांना आपल्या पाल्याची प्रगती व महाविद्यालयात घेतल्या जाणा-या विविध अॅक्टीव्हीटी या विषयी माहिती व्हावी यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पालक मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. श्याम कुलकर्णी यांनी लाॅकडाऊन कालावधीत महाविद्यालयाने ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले या विषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन नये यासाठी घरी राहून सुद्धा विद्यार्थ्यांनी युटूब चॅनल च्या माध्यमातून लेक्चर आम्ही विद्यार्थ्यांपर्यत पोहवली आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर नामांकित वेबिनार आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना गेट परिक्षेसाठी मोफत मार्गदर्शन करण्यात येत असुन विद्यापीठात निकाल उत्कृष्ट आहे. याशिवाय मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील मेसा माध्यमातून भविष्यात जास्तीत जास्त अॅक्टीव्हीटी राबविण्यात येणार असुन पालकांनी सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे मत डाॅ. श्याम कुलकर्णी यांनी या मेळाव्यात बोलताना व्यक्त केले. ऑनलाईन पालक मेळावा आयोजित केल्याबद्दल पालकांनी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कौतुक करून अभिनंदन केले.
या मेळाव्यात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या नियमाने ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याचे काम सुरू आहे. विद्यार्थ्यांचे कुठल्या ही प्रकारे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महाविद्यालय प्रयत्न करीत आहे. लाॅकडाऊन कालावधीत विद्यार्थ्यांना १४ हून अधिक वेबिनार आयोजित करण्यात आली होती. जगातील नामांकित कंपनीत १४८ हून अधिक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. आपल्या घरी राहूनच विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घ्यावे. नेटवर्क समस्या निर्माण झाल्यास वेबसाईट वर संबंधित विषयाचे लेक्चर अपलोड केलेले विद्यार्थ्यांनी पाहुन अभ्यास करावा. शिवाय पालकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षणासाठी लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी या दरम्यान व्यक्त केले.
या मेळाव्यात सहभागी झालेल्या पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी उत्तरे दिली. सहभागी पालकांचे डाॅ. श्याम कुलकर्णी यांनी आभार मानले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील प्रा. योगेश शिंदे, प्रा. इम्रानहुसेन पिरजादे यांनी परिश्रम घेतले.
0 Comments