Hot Posts

6/recent/ticker-posts

इलेक्ट्रो प्रदर्शन - दि. १२ ते १८ फेब्रुवारी होम मैदानावर भव्य स्वरुपात

 इलेक्ट्रो प्रदर्शन - दि. १२ ते १८ फेब्रुवारी

होम मैदानावर भव्य स्वरुपात


-

सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डिलर्स असोसिएशन द्वारा इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्पुटर, टेलिकम्युनिकेशन,होम अप्लायन्सेस, सोलार सिस्टम, फिटनेस इक्विपमेंटस् चे भव्य प्रदर्शन "इलेक्ट्रो २०२६" चे आयोजन केले गेले आहे. दि. १२ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत होम मैदानावर हे प्रदर्शन आयोजित केले असल्याची माहिती सेडाचे अध्यक्ष डॉ. सुरजरतन धूत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यंदा इलेक्ट्रो प्रदर्शनाचे व्ही प्लस हे मुख्य प्रायोजक तर विझेडवाय टीव्ही, लक्ष्मी ऑटोमोबाइल्स, अपार केबल्स, हाईफा इलेक्ट्रिकल्स्, हे सह प्रायोजक असून एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी हे शैक्षणिक सहपप्रायोजक पार्टनर आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवार दि. १२ फेब्रुवारी रोजी सायं. ५ वा. होणार असल्याची माहिती इलेक्ट्रो चेअरमन  जितेंद्र राठी यांनी सांगितले.


   ७ दिवस चालणा-या इलेक्ट्रो २०२६ या प्रदर्शनाचे हे २६ वे वर्ष असून सोलापूर शहर जिल्हा व महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा, तेलंगाणा व इतर आजूबाजूंच्या शहरातील सर्व ग्राहक या प्रदर्शनाची वाट पाहत असतात. दररोज दु. ४ ते रा. ९.३० व रविवारी स. ११ ते रा.९, ३० पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असून एलईडी, फ्रिज, साईड बाय साईड फ्रिज, एअर कंडीशनर, म्युझिक सिस्टीम, वॉशिंग मशीन, डिश टिव्ही, मायक्रोवेव ओव्हन, व्हॅक्यूम क्लिनर, एअर कंडीशनर, कॉम्प्युटर, लॅपटॉप प्रिंटर्स, नेटवर्किंग- वायफाय प्रॉडक्ट्स, बिझनेस सॉफ्टवेअर, सोलार सिस्टीम, गॅस गिझर, मोबाईल, आय पॅड, टेलीफोन, मिक्सर, फूड प्रोसेसर, आटा चक्की, एअर कुलर, वॉटर प्युरीयर, स्टॅबीलायझर, चिमणी हुड, फिटनेस इक्विपमेंटस् इत्यादी या प्रदर्शनामध्ये उपलब्ध असतात. ग्राहकांना विविध नमुन्यात व विविध रंगात आकर्षक किंमतीत निरनिराळ्या योजनांखाली वस्तू खरेदी करता येतात. तसेच फायनान्स कंपनीच्या माध्यमातून शुन्य टक्के व्याज दराने कर्जाची उपलब्धता देखील केली जाते.


     सेडा तर्फे आयोजित केलेल्या इलेक्ट्रो २०२५ ला स्टॉल धारकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता . यावर्षी सुमारे ३६० स्टॉल्स असणार असून सुमारे एक लाख पेक्षा जास्त ग्राहक प्रदर्शनास भेट देतील. प्रदर्शनाचे यंदाचे खास आकर्षण म्हणजे एआय वर आधारीत टीव्ही ची नवीन 100 ते 120 इंचची श्रेणी, सोलार चार्जर स्टेशन, डिजिटल होम अप्लायन्सेस, बारकोड स्कॅन केल्यावर घरबसल्या संपूर्ण माहिती, सह ५ वेगळे डोम्स (जर्मन हँगर) मध्ये प्री फॅब्रीकेटेड व कंपनी फिटेड स्टॉल्स असणार आहेत.


या प्रदर्शनामध्ये ठिकठिकाणी ग्राहकांना बसण्याची सोय, मोफत पार्किंग तसेच शुध्द पिण्याचे पाण्याची सोय केलेली आहे. भेट देणाऱ्या ग्राहकांना दररोज लकी व शेवटच्या दिवशी बंपर ड्रॉ काढण्यात येणार आहे.




   सर्व स्टॉल मध्ये जवळपास 450 विविध कॉलेजमधील पदवीधर व एमबीए विद्यार्थ्यांना सेडा) मार्फत ट्रेनिंग देवून ग्राहक सेल्स माहिती देण्यात येणार आहे. या प्रदर्शनाच्या संपूर्ण संयोजनसाठी सेडाद्वारे विविध समित्या कार्यरत आहे. यंदाचे प्रदर्शन हे वैविध्यपूर्ण, नाविन्यपूर्ण आणि सुविधापूर्ण असणार आहे. धुळमुक्त प्रदर्शनासाठी संपूर्ण मैदान वर मॅटींगची व्यवस्था करण्यात आली आहे. स्टॉलधारक आणि प्रेक्षकांसाठी विविध सोयी उपलब्ध करण्यात येणार असुन यामध्ये खवय्या साठी फूड कोर्ट इ. सोयी असणार आहेत. दिव्यांग व्यक्तिंना देखील प्रदर्शन अनुभवता येणार असुन त्यांच्यासाठी व्हील चेअरची विशेष सोय करण्यात आली आहे. प्रेक्षक आणि स्टॉल धारक यांच्या सुरक्षिततेसाठी फायर ब्रिगेड तसेच सिक्युरिटी गार्डस ही नेमण्यात आले आहेत. प्रदर्शन दरम्यान दररोज रक्तदान उपक्रम घेतला जाणार आहे. संपूर्ण प्रदर्शन जास्तीत जास्त कसे डिजीटल होईल यावर संपूर्ण कटाक्ष आहे. प्रर्दशनासाठी प्रशस्त मोफत पार्कींगची सोय व माहितीसाठी वेगळे काऊंटर व सहभागी स्टॉलची माहिती क्युआर कोड द्वारे सर्वांना त्यांच्या मोबाइलवरच मिळण्याची सोय यंदा करण्यात आली आहे अशी माहिती इलेक्ट्रो चेअरमन जितेंद्र राठी यांनी दिली.


   सेडा तर्फे अनेक सामाजिक उपक्रम ही राबविण्यात येत असून त्यामध्ये सेडाच्या सभासदांच्या कर्मचाऱ्यांसाठी शैक्षणिक व वैद्यकिय मदतही करण्यात येते. कर्मचारी प्रशिक्षणासह व्यवसाय वृध्दीसाठी कार्यशाळेचेही आयोजन करण्यात येतात. या प्रदर्शनातही दोन स्टॉल्स सामाजिक संस्थांना उपलब्ध करुन दिले असून इच्छुक सामाजिक संस्थांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


   या पत्रकार परीषदेस सेडाचे उपाध्यक्ष भुषण भुतडा, सचिव हरीश कुकरेजा, खजिनदार सुयोग कालाणी, सह सचिव गिरीश मुंदडा, संचालक सर्वश्री चंद्रकांत शाहपुरे, बसवराज नवले, रवींद्र पाचलग, विजय टेके, सचिन करवा, सुनील भांजे व संस्थेचे माजी अध्यक्ष आनंद येमूल, ईश्वर मालू, शिवप्रकाश चव्हाण, खुशाल देढीया, दिपक मुनोत, समीर गांधी, कौशिक शाह, केतन शाह, सतिश मालू, विपीन कुलकर्णी, आनंदराज दोशी, दिलीप राऊत व इतर इलेक्ट्रो कमिटी सदस्य आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments