Hot Posts

6/recent/ticker-posts

स्वच्छ व सुंदर गाव बनवण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्वाचा- खताळ

 स्वच्छ व सुंदर गाव बनवण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्वाचा- खताळ




भोसे (कटूसत्य वृत्त):- ओला आणि सुका कचरा व्यवस्थापनात नागरिकांनी कचरा वेगळा करून देणं आवश्यक आहे, कारण घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार, प्रत्येक नागरिकाने घरगुती आणि व्यावसायिक कचऱ्याचे वर्गीकरण करणे बंधनकारक आहे  तसेच, स्वच्छ गावासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे कचरा व्यवस्थापनात नागरिकांची भूमिका महत्वाची असू शकते असल्याचे मत हुन्नूर चे ग्रामपंचायत अधिकारी कालिदास खताळ यांनी सांगितले हुन्नूर येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घंटागाडी लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.यावेळी स्वच्छ भारत मिशनचे धर्मराज सकमवारु, ग्राम रोजगार सहाय्यक तूशांत माने,भानुदास सरगर सचिन पाटील एल.बी पुजारी बी.एम पुजारी गोरख आवताडे सुनील पुजारी खंडू करे बिरा चव्हाण तमा कोळी सचिन बंडगर ग्रामपंचायत कर्मचारी म्हाळाप्पा माने,आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्रामपंचायत अधिकारी कालिदास खताळ यांनी माहिती देताना पुढे सांगितले की गटविकास अधिकारी डॉ.जस्मिन शेख विस्तार अधिकारी अशोक नलावडे,हरिदास नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली हुन्नूर गाव प्रगती पताकडे नेण्याचा प्रयत्न असून विकासाच्या दृष्टिकोनातून लोक सहभाग महत्वाचा असून गावातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेत परिसरातील कचरा साफ करून परिसर स्वच्छ, नीटनेटका आणि आकर्षक बनविला. स्वच्छतेचे महत्त्व जनमानसात रुजविणे आणि समाजात स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे सांगितले व या नवीन घंटागाडी मुळे गावातील कचरा संकलन व्यवस्थेस गती मिळेल. नागरिकांना वेळेत व सुटसुटीत सेवा मिळेल.हुन्नूर हे गाव हे स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी गाव बनविण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचे हुन्नूर चे ग्रामपंचायत अधिकारी कालिदास खताळ यांनी सांगितले.
Reactions

Post a Comment

0 Comments