Hot Posts

6/recent/ticker-posts

डॉ.शिवरत्न शेटे यांचा एस.एन.ओ.च्या वतीने सत्कार

डॉ.शिवरत्न शेटे यांचा एस.एन.ओ.च्या वतीने सत्कार

केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या तज्ञ शिष्टमंडळात सल्लागार पदी निवड झाल्याबद्दल सोलापूर निसर्गोपचार संघटनेच्या वतीने सत्कार

सोलापूर, (क.वृ.): कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावर आणि भारताच्या रुग्णसंख्या वाढीवर नियंत्रण मिळवण्याकरिता, केंद्रीय आयुष मंत्रालया मार्फत देशातील आयुर्वेद शास्त्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तज्ञ वैद्यांच्या चमु मध्ये महाराष्ट्रात शिव व्याख्याते म्हणून ख्याती असलेले सोलापूरचे प्रसिद्ध डॉ.शिवरत्न शेटे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार सोलापूर निसर्गोपचार संघटनेच्यावतीने शिवसह्याद्री आरोग्यधाम ह्या त्यांच्या क्लिनिक मध्ये करण्यात आले. 

कोरोना आजारावर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करण्यासाठी आणि आयुर्वेदचा सकारात्मक प्रचार संपूर्ण जगात करण्यासाठी ह्या तज्ञ शिष्टमंडळाची निवड करण्यात आली असून सदर सल्लागार समिती केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या देखरेखीखाली कार्य करणार आहे असे डॉ.शिवरत्न शेटे यांनी स्पष्ट केले. जगावर आलेल्या ह्या कठिण प्रसंगी निसर्गोपचार आणि आयुर्वेदचा आधार घेऊन मनुष्याने सात्विक जीवनशैलीचा अंगीकार करुन रोगप्रतिकारकशक्ती वाढवावी तथा स्वतःसमवेत संपूर्ण परिवाराच्या आरोग्यची काळजी घ्यावी असे गिरिकर्णिका फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी त्यांच्या प्रास्ताविकेत नमूद केले.

निसर्गोपचार आणि आयुर्वेदचा सकारात्मक परिणाम कोरोना काळात अनेकांनी अनुभवला असून आता ह्या शास्त्राचा प्रसार व्यापक स्वरूपात होणे आवश्यक आहे असा आशावाद क्रांतीवीर महिंद्रकर यांनी व्यक्त केला. सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन योगीन गुर्जर यांनी केले, सत्कारावेळी सोलापूर निसर्गोपचार संघटनेचे श्रीकांत अंजुटगी, पर्जन्या अंजुटगी, राजेश गारमपल्ली,डॉ.मुकुंद लिमये, विशाल व्हटकर, धारा व्होरा आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments