चीन मध्ये अडकलेले भारतीय अधिकारी व कर्मचारी लवकरच मायदेशी परतणार : आ. मोहिते पाटील

अकलूज (क.वृ.): गेल्या पाच महिन्यांपासून चीन मध्ये अडकलेल्या २३ भारतीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असून ते येत्या आठ दिवसात मायदेशी परततील असा विश्वास आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केला.
ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनी या मुंबई येथील भारतीय मर्चट नेव्ही कंपनीचे जहाज ऑस्ट्रेलिया येथून कोळसा सप्लाय करण्यासाठी चीन देशातील बंदरापाशी गेल्यानंतर चीन सरकारने कोळसा स्विकारण्यास नकार दिला होता . त्यामुळे तब्बल गेल्या ५ महिन्यांपासून हे जहाज व या जहाजावर कार्यरत असलेले भारतातील २३ अधिकारी व कर्मचारी अडकून पडलेले होते. यात पंढरपूरचे सुपूत्र विरेंद्रसिंह भोसले हे देखील होते . त्यांच्या जवळचा औषध - गोळ्यांचा साठा संपत आलेला असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांची मानसिकता देखील ढासळत चाललेली होती . या सर्वांची सुटका करण्यासाठी वीरशैव सभेचे पंढरपूर शहराध्यक्ष विशाल आर्वे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेवून निवेदन देवून या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची सोडवणूक करावी अशी विनंती केली होती.
आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जी २० ,जी ७ चे शेरफा सुरेश प्रभू यांच्याशी दूरध्वनी द्वारे संपर्क साधत न्याय मिळवून देण्याची विनंती केली होती. यावर तात्काळ सुरेश प्रभू यांनी राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पातळीवर संपर्क साधत सूत्रे हलविली होती. काही संबंधित अधिकाऱ्यांशीही आ. रणजितसिंहानी दूरध्वनीवरून संपर्क साधत प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून दिले होते. चार दिवस यासाठी त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि शेवटी मिनिस्टर ऑफ एक्स्टर्नरी कार्यालयाकडून जहाज कंपनीचे अधिकारी यांनी त्वरीत कागदपत्रे घेवून चीनमध्ये जात आपले जहाज व जहाजेवर कार्यरत असलेले २३ अधिकारी, कर्मचारी यांना भारतात घेवून येण्याची ऑर्डर इश्यू करण्यात आलेली असल्याचे कळविले होते . भारतीय अधिकारी, कर्मचारी यांची आता अधिक गैरसोय होऊ नये याकरिता चीनमधील भारतीय दूतावासात त्यांना हलवण्याची देखील सोय करण्यात आलेली होती.
0 Comments