करमाळा तालुका बिबट्याच्या दहशतीखाली

करमाळा (क.वृ.): करमाळा तालुक्यात बिबट्याचा वावर वाढला असून करमाळा तालुक्याचा ग्रामीण भाग बिबट्याच्या दहशतीखाली आला आहे. करमाळा तालुक्याच्या शेजारील तालुक्यात बिबट्याने दोन नागरिकांना ठार केले असून खडकी ,जातेगाव परिसरातील लोक भयभीत झाले असून पिकांना पाणी देणे, मशागतीच्या कामांना खीळ बसली आहे. लोक घरच्यां छतावर जीव मुठीत घेऊन बसत असून वन विभाग नेहमीप्रमाणे उदासीन दिसून येत आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात बिबट्याने जनावरांवर हल्ला केला असून अनेक जनावरे बिबट्याची शिकार झाली आहेत. काही दिवसांपूर्वी केडगाव शिवारात बिबट्याचे दर्शन झाले होते. वन प्रशासन मात्र बिबट्या नसल्याचे सिद्ध करण्यात मश्गूल आहे.
भिलारवाडी ता.करमाळा शिवारात बिबट्यासदृय प्राण्याची दहशद वाढली असुन वाल्मिक नामदेव काटे यांच्या एका वासराचा आज रात्री बिबट्याने फडशा पाडला असुन एका गाईला जखमी केले आहे. या घटनेमुळे भिलारवाडी परिसरात भितीचे वातावरण पसरले असुन भिलारवाडी ग्रामपंचायतीने बिबट्याला पकडण्यासाठी ठराव घेतला असुन हा ठराव वनविभागाला पाठवला आहे.
भिलारवाडी परिसरात ता.२९ नोव्हेंबर रोजी बाळु माने यांच्या गोठ्यातील वासराला बिबट्याने जखमी केले होते.आज रात्री पुन्हा त्याच शिवारात बिबट्याने पून्हा वाल्मिक काटे यांच्या वासरावर हल्ला करुन वासराचा फडशा पाडला आहे तर गाईला जखमी केले आहे.
गेली तीन ते चार महिन्या पासुन कात्रज,टाकळी,रामवाडी या परिसरात बिबट्या सदृष्य प्राणी आढळला होता. विठ्ठलवाडी ता.करमाळा शिवारात संतोष वारगड यांच्या घरासमोरिल गोठ्यात बांधलेली शेळी बिबट्यासदृष्य प्राण्याने खाल्ली होती.त्यानंतर या बिबट्याने भिलारवाडी परिसरात पाळीव प्राण्यांवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे.
या घटनेविषयी काटे यांनी सांगितले कि मी काल सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शेतामध्ये गेलो होतो.त्यावेळी मला शेतात एक बिबट्या व दोन लहान पिल्लं दिसली होती.हि माहिती मी ग्रामस्थांना सांगितली होती.त्यानंतर रात्री बिबट्याने मध्यरात्री आमचे वासरु खाल्ले आहे.वनविभागाने या भागात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी केली आहे.
याविषयी बोलताना भिलारवाडी चे सरपंच भरत गिरंजे म्हणाले की,भिलारवाडीत बिबट्या सदृष्य प्राण्याच्या हल्ल्यामुळे गाव भयभित झाले आहे.वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा यासाठी ग्रामपंचायतीने आज ठराव घेतला आहे. अशी प्रतिक्रीया भिलारवाडीचे सरपंच भरत गिरंजे यांनी दिली.
पश्चिमभागात बिबट्या सदृष्य प्राण्याने पाळीव प्राण्यावर हल्ले सुरु केले आहेत.परंतु वनविभागाने भेटीदेण्याशिवाय कसलीही कार्यवाही केली नाही.वनविभागाबद्दल नागरिकांमध्ये रोश वाढत चालला आहे.
मोहळचे वनपाल ज्ञानेश्वर साळुंखे यांच्याशी संपर्क करुन या घटनेविषयी माहिती दिली असता.कर्मचार्यांना घटनास्थळास भेट देण्यास सांगतो असे श्री.साळुंखे यांनी सांगितले.
0 Comments