शेतीपुरक व्यवसाय करणे काळाची गरज - विजयसिंह मोहिते पाटील

अकलूज (क.वृ.): शेतकऱ्याने केवळ शेती करुन चालत नाही मातीतराबून आपले आयुष्य मातीमोल करण्यापेक्षा तरुणानी शेतीवर आवलंबून न राहता जीवन जगण्यासाठी शेतीपुरक व्यवसाय करणे काळाची गरज आसल्याचे मत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी पायरी पुल (ता.माळशिरस) येथील राहतअली हायटेक नर्सरी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
याप्रसंगी सोलापूर जिल्हा परिषद सदस्य अरुण तोडकर, माळशिरस पंचायत समिती सदस्य प्रतापराव पाटील, गणेश गावचे माजी सरपंच रहिमअली शेख, शरफुददीन कोरबु दुध डेअरीचे चेअरमन गुलाब शेख, नौशाद शेख, अमर शेख आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गणेशगाव येथील अश्रफआली फकरुद्दीन शेख या मुलाने नुकत्याच झालेल्या CET परिक्षेत ९९.२५% गुण मिळवल्याने विजयसिंह मोहिते पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. तर राहत अली हायटेक नर्सरीचे इर्शाद शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले.
0 Comments