आप्पासाहेब निकत यांचा वन विभागाकडून राज्यस्तरीय रजत पदक देऊन गौरव

करमाळा (क.वृ.): उंदरगाव ता. करमाळा येथील व सध्या ठाणे विभागीय वन अधिकारी (DFO) म्हणून कार्यरत असलेले श्री.आप्पासाहेब सुभाष निकत यांनी वन विभागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सर्वोत्कृष्ट,नविन्यपूर्ण व विकासात्मक, कार्य केल्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय रजत पदक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे, त्यांना मिळालेल्या या पुरस्कारबद्दल मकाई चे संचालक महादेव सरडे, उंदरगावचे उपसरपंच रेवन्नाथ निकत, करमाळा तालुका पोलीस पाटील संघटनेचे सचिव विजय निकत,मा सरपंच पांडूरंग ताकमोगे, प्रा.राजेंद्र निकत ग्रामसेवक यशवंत कुदळे, नारायण कांबळे, किरण ताकमोगे, तुकाराम कांबळे, सोमनाथ कांबळे, सुनील इंगळे, सुशिल खरात, आप्पा वीर, हनुमंत निकत, सागर कुंभार यांनी विशेष अभिनंदन केले.
0 Comments