Hot Posts

6/recent/ticker-posts

पोलीस शिपाई परचंडे यांच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत


पोलीस शिपाई परचंडे यांच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत


            सोलापूर,  दि. 11-  कोविड 19 अनुषंगाने कर्तव्य बजावत असताना  मृत झालेले  पोलीस शिपाई रामेश्वर गंगाधर परचंडे यांच्या कुटुंबियास पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते दहा लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
    कर्तव्यावर असताना श्री परचंडे यांचे 22 मे 2020 रोजी निधन झाले होते. त्यांच्या परिवारास पोलीस महासंचालक कार्यालयाकडून कोविड -19 प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत विशेष सहायता निधी मंजूर झाला होता.  तो निधी पालकमंत्री श्री.भरणे यांच्या हस्ते  परचंडे यांच्या पत्नी नम्रता परचंडे, आई सुमन परचंडे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता संजीव ठाकूर आदी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments