सोलापूर महापालिका हद्दीत ९१ कोरोना पॉझिटिव्ह,रुग्णसंख्या १४०१ वर, ७७२ रुग्ण बरे
सोलापूर (क.वृ)- सोलापूरात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढताना दिसतोय गुरुवारी महापालिका हद्दीत तब्बल ९१ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण वाढले आहेत. यात 62 पुरूष आणि 29 महिलांचा समावेश आहे तर मृतांची संख्या 1 नं वाढून 123 इतकी झाली आहे.
आत्तापर्यंत 8577 व्यक्तींची कोरोना चाचणी घेण्यात आली यातील 8456 अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 7055 निगेटिव्ह तर 1401 पॉझिटिव्ह अहवाल आहेत.
आज महापालिका हद्दीत एका दिवसात 176 अहवाल प्राप्त झाले यात 86 निगेटिव्ह तर 91 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. बरं झाल्यानं रूग्णालयातून 13 जणांना आज घरी सोडण्यात आलं. तर 506 जण आजून रूग्णालयात उपचार घेत आहेत.
आतापर्यंत ७७२ जणांनी कोरोनावर मात केली आहे
0 Comments