Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराष्ट्राला पुन्हा उभारी देण्यासाठी राष्ट्रवादीची धडपड

 महाराष्ट्राला पुन्हा उभारी देण्यासाठी राष्ट्रवादीची धडपड



सोलापूर (क.वृ)- कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे जो रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे तो भुरुन काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 21 व्या वर्धापन दिनाचे आवचित्य साधून सोलापूर शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरा विषयी माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष भारत जाधव काय म्हणाले ते पहा. 
यंदाच्या वर्धापन दिनाला कोरोना महामारी आणि निसर्ग चक्रीवादळाची पार्श्वभूमी असल्याने महाराष्ट्राला पुन्हा नव्याने उभारी देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वर्धापन दिनी लोकसेवेसाठी समर्पित होण्याचा निर्धार करावा आणि रक्तदान शिबीरांचे आयोजन करुन गरज असलेल्या रुग्णांना मदत करावी असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते.
त्यांच्या आवाहनला प्रतिसाद देत सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलं होते.


या शिबिराचे उद्घाटन शहर अध्यक्ष भारत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी स्वतः रक्तदान करुन केले.
या रक्तदान शिबिरात युवती, युवक, महीला व पुरूष आशा 153 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकीच कर्तव्य बजावले.
यावेळी गटनेते किसन जाधव, महेश गादेकर, मनोहर सपाटे, दिलीप कोल्हे, बशीर शेख, महिला अध्यक्ष सुनिता रोटे, युवक अध्यक्ष जुबेर बागवान, अल्पसंख्याक अध्यक्ष राजू कुरेशी, विद्यार्थी अध्यक्ष निवांत सावळे, कार्याध्यक्ष सुहास कदम, श्रीनिवास कोंडी, अमीर शेख, प्रकाश जाधव, अजित पात्रे, गुलजार मनिषा नलावडे, लता ढेरे, आरती हुलै, युवराज माने, शाम गांगडै, शिवराज विभुते, महम्मद इंडीकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व शहर पदाधिकारी सर्व सेलचे, फ्रंटल चे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले
Reactions

Post a Comment

0 Comments