मोहोळ मध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे २१ व्या वर्धापनदिना निमित्त २२१ जणांचे रक्तदान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 10, 2020

मोहोळ मध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे २१ व्या वर्धापनदिना निमित्त २२१ जणांचे रक्तदान

मोहोळ मध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे २१ व्या वर्धापनदिना निमित्त २२१ जणांचे रक्तदान

मोहोळ( क.वृ): मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून माजी आमदार राजन पाटील तसेच लोकनेते शुगर चे चेअरमन बाळराजे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त 10 जून रोजी मोहोळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 221 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.यावेळी सहभागी प्रत्येक रक्तदात्यास मास्क,सॅनिटायझर व स्टीलचा जेवणाचा डबा भेटवस्तू म्हनून देण्यात आला.या रक्तदान शिबिराचे उदघाटन माजी आमदार राजन पाटील आणि आमदार यशवंत माने यांच्या हस्ते करण्यात आले.


  बुधवार दिनांक १० जून २०२० रोजी मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मोहोळ राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने पक्षाच्या २१ व्या वर्धापनदिना निमित्ताने माजी आमदार राजनजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रसंगी माजी आमदार राजन पाटील व आ यशवंत माने यांच्या हस्ते करण्यात आले.
 सर्वप्रथम लोकनेते बाबूराव(आण्णा)पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन आ.यशवंत माने यांच्या शुभ हस्ते करुन माजी आमदार राजन पाटील यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिरास प्रारंभ करण्यात आला.


  यावेळी तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, सभापती रत्नमाला पोतदार,नगराध्यक्ष शौकत भाई तलफदार,प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर,बाजार समिती सभापती असल्लमभाई चौधरी,उपसभापती दत्ता पवार,नागेश साठे,शहाजहान शेख,हनुमंत पोटरे, जि.प सदस्य शिवाजी सोनवणे,पंचायत समिती सदस्या सिंधूताइ वाघमारे,जालदिंर लांडे,राजाभाऊ गुंड,रामराजे कदम,दीपक माळी,शशिकांत पाटील, शहराध्यक्ष यशोदाताई कांबळे,शहर अध्यक्ष कुंदन धोत्रे,युवक अध्यक्ष राहूल मोरे, विद्यार्थी अध्यक्ष सुदर्शन कादे, सरचिटणीस प्रशांत बचुटे कार्याध्यक्ष विकास कोकाटे,शहराध्यक्ष चेतन मांडवे,संतोष सुरवसे,प्रमोद डोके,संतोष वायचळ,अण्णा फडतरे,जयवंत गुंड,वकील सेल युवराज पाटील, उपसरपंच रामदास चवरे,विजय कोकाटे,सचिन चवरे,गोपाळ शेळके,राजाभाऊ सलगर,ब्रम्हदेव भोसले,नागेश बिराजदार,विकिराजे भोसले, विजयकुमार पोतदार,सचिन पाटील,धनाजी गोडसे,रावसाहेब भाकरे,नवनाथ अवताडे,विजय कोकाटे,संतोष मते,गणेश भोसले महेश पवार,श्रीकांत शेम्बडे प्रकाश कस्तुरे,गणेश जगताप,अनिल कादे,बबन गोडसे,ब्रह्मदेव चव्हाण,बाळासाहेब भोसले,जगन्नाथ कोल्हाळ,बाळासाहेब शेळके,विलास शेळके,सह मोठ्या संख्येने युवक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages