हत्तूर जि. प. शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात
हत्तूर (कटूसत्य वृत्त):- दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात पार पडला.
बाल मेळाव्याचे उदघाटन सहाय्यक गट विकास अधिकारी मल्हारी बनसोडे, सरपंच ज्योतीताई कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बसवेश्वर पतसंस्थेचे चेअरमन विकास पाटील, स्वामी समर्थ पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र कुलकर्णी, मलकारी कोरे, प्रा. सिद्धाराम म्हेत्रे. विश्वनाथ पाटील, दिनेश कुलकर्णी, अनिल भरले, बनसिद्ध पटेवडीयर, सिद्धाराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते नवीन सांस्कृतिक व्यासपीठ व पाण्याच्या टाकीचे उदघाटन, वृक्षारोपण तसेच आदर्श विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान, स्वनिमिर्तीचा आनंद, खरेदी विक्री नफा- तोटा याचे प्रात्यक्षिक समजण्यासाठी बाल आनंद बाजार भरविण्यात आला होता. यात प्रामुख्याने शेतात पिकवलेले व परसबागेतील भाज्या, फळे व स्वतः तयार केलेले खाद्य पदार्थ आदी साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.
याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांकडून साहित्य खरेदी करून लहान मुलांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव साबळे यांनी केले तर मुख्याध्यापक सिद्धाराम गुरव यांनी आभार मानले.

0 Comments