फुले फेस्टिव्हलच्या अध्यक्षपदी कु.प्रगती मोहिते यांची निवड
अकलूज (कटूसत्य वृत्त):- महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर देश-विदेशात पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल २०२६ च्या अध्यक्षपदी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील नवोदित कवयित्री कु.प्रगती राजू मोहिते यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.हे फेस्टिवल पुणे येथील एस.एम.जोशी फाउंडेशन समाजभवन येथे दि.२,३,४ व ५ जानेवारी २०२६ दरम्यान चार दिवसांचा महोत्सव आयोजित केला असल्याचे माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.
महाराष्ट्रासह देशभरातील व परदेशातील कवींसाठी हा फेस्टिव्हल एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार असून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण, समता,स्त्री-पुरुष समानता, सामाजिक न्याय व संविधानवादी विचारधारेवर आधारित कविता सादरीकरणासाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली आहे.निवड झालेल्या कवींना फेस्टिव्हल दरम्यान आपली कविता सादर करण्याची संधी मिळणार आहे.
या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी अकलूजच्या कवयित्री कु.प्रगती राजू मोहिते यांची निवड झाली आहे.प्रगती मोहिते यांच्या माध्यमातून होत असलेल्या महोत्सवातील सहभागामुळे अकलूजला सन्मान मिळणार आहे.निवड झालेल्या कवींनी दि.२ जानेवारी २०२६ रोजी कविता सादरीकरणासाठी उपस्थित राहावे.असे आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
चौकट...
प्रगती प्रिया राजू मोहिते यांना लहानपणापासूनच कविता लिहण्याची गोडी असून त्यांनी पहिली कविता इयत्ता ४ थी शिकत असताना कविता लिहण्यास सुरुवात केलेली आहे.आजपर्यंत त्यांनी ३० हून अधिक कविता लिहिल्या आहेत.अनेक विविध विषयांवर कविता लिहिलेल्या आहेत.त्यांच्या कवितेतून एकांत,आत्मशोध,निसर्ग, भावना,संघर्ष आणि जीवनातील सूक्ष्म जाणिवा यांचा सुंदर संगम दिसून येतो.नव्या पिढीतील तरुण कवियत्री असून त्यांच्या कवितेतील शब्द मनाला स्पर्श करणारे,विचार आणि प्रेरणा व्यक्त करत असतात. लवकरच प्रगती मोहिते यांची पहिली कादंबरी लवकरच प्रकाशित होणार आहे.
कु.प्रगती राजू मोहिते
नवोदित कवियत्री अकलूज
.png)
0 Comments